प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर सोमवार दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरे खुर्द येथे इयत्ता पहिलीचा शाळा प्र...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
सोमवार दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरे खुर्द येथे इयत्ता पहिलीचा शाळा प्रवेशोत्सव, इयत्ता सातवीचा सदिच्छा समारंभ व हिवरे खुर्द शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांचा कार्यगौरव समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहिदास जाधव होते.
कार्यक्रम प्रसंगी अशोक लांडे साहेब, गटशिक्षणाधिकारी जुन्नर, विष्णू धोंडगे शिक्षण विस्तार अधिकारी, रविंद्र कुटे केंद्रप्रमुख, सरपंच मनेश बर्डे, उपसरपंच लक्ष्मण वायकर, शिक्षक नेते सत्यवान म्हस्के, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मच्छिंद्र भोर, सागर वायकर अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, उपाध्यक्षा दिपाली जाधव, संतोष शिर्के, अन्वर शेख, वर्षा बर्डे , तारामती वायकर, शितल वाघचौरे, हिना शेख, हिवरे खुर्द गावातील अंगणवाडी सेविका अलका घोलप, सपना औटी, शैला येंधे, सुवर्णा बेनके वरील सर्व मान्यवरांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने करण्यात आला. तसेच कार्यक्रम प्रसंगी ग्रामस्थ, पालक व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
इयत्ता पहिलीचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. नवीन प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचा फेटा बांधून, शालेय वस्तू, गुलाबपुष्प व खाऊ देऊन साजरा करण्यात आला. तसेच इयत्ता सातवीचा सदिच्छा समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रम प्रसंगी आवनी येंधे, ईशिका वायकर, मानसी वायकर, ईश्वरी जाधव व जिकरा शेख या विद्यार्थीनीनी यांनी आपले शाळेविषयी व मार्गदर्शक शिक्षकांविषयी भावनिक मते व्यक्त केली. इयत्ता सातवी बॅचच्या वतीने शाळेस मुख्याध्यापक कार्यालयासाठी घड्याळ व शिक्षकांसाठी भेट वस्तू देण्यात आल्या.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरे खुर्द शाळेतून सुरेखा विजय नवले व सीमा चंद्रकांत जाधव या दोन्ही शिक्षिकांचा ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक वृंद यांच्या वतीने सन्मानपत्र, शाल व गुलाबपुष्प देवून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सुरेखा विजय नवले यांनी शाळेबद्दल भावनिक मनोगत व्यक्त केले. तसेच सीमा जाधव यांनी शाळेची वाढत चाललेली प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. तसेच इयत्ता चौथी व पाचवी चा एन.एस.एस.इ.च्या स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश मिळविल्याबद्दल विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक निलेश सरोदे यांचे मान्यवरांनी कौतुक केले. रोहिदास जाधव, लक्ष्मण वायकर, सागर वायकर, मच्छिंद्र भोर, सपना औटी व शिक्षक वृंद यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन विकास मटाले, सुरेखा म्हस्के, वर्षा जाधव यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अन्वर सय्यद मुख्याध्यापक, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश सरोदे यांनी केले व आभार गुणवंतराव इंगळे यांनी मानले.



COMMENTS