बोतार्डे | जुन्नर तालुक्यातील बोतार्डे ग्रामपंचायतमधील आकृतीबंधातील कर्मचारी संतोष शिवराम शिंदे हे मागील २०२४ मध्ये सेवा निवृत्त झाले, त्य...
बोतार्डे | जुन्नर तालुक्यातील बोतार्डे ग्रामपंचायतमधील आकृतीबंधातील कर्मचारी संतोष शिवराम शिंदे हे मागील २०२४ मध्ये सेवा निवृत्त झाले, त्यानंतर जवळपास एक वर्षाने ग्रामपंचायत बोतार्डे यांनी सदर रिक्त जागा भरण्याकरिता भरती जाहिरात काढली होती, सदर जागेवर तोपर्यंत एकही अर्ज आलेला नव्हता त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील १८ सप्टेंबर २०२५ रोजी एक अर्ज आला, आणि त्याच दिवशी ग्रामपंचायतीची मासिक सभा होती त्या सभेला ३ ते ४ सदस्य उपस्थित होते, त्या दिवशी दुसऱ्या व्यक्तीला त्या जागेवर घेतलं गेल, मात्र दोन्ही व्यक्ती एकाचं वेळी हजर असताना ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक व इतर सदस्यांनी एकाचं व्यक्तीला थांबवून त्याला त्या जागेवर घेतलं, मात्र सध्या प्रश्न त्या भरती जाहिरात काढल्यासंदर्भात आहे, जर भरती प्रक्रियेत अर्ज गेले ८ महिन्यापासून ग्रामपंचायत स्तरावर घेतले आहेत तर अर्ज पुढे शासनाला का पाठवले नाहीत? आणि वारंवार त्या संदर्भात ग्रामसेवक प्रकाश नांगरे यांना विचारले असता अर्ज पुढील मासिक सभेत ठेवणार असून काय होतंय त्यावर मग पत्र देणार असल्याचे नांगरे म्हणाले मात्र ही भरती प्रक्रिया करण्यासाठी विलंब का केला गेला, ग्रामसेवक प्रकाश नांगरे यांनी विहित नमुन्यातील अर्ज जर घेतले आहेत तर भरती प्रक्रिया राबवली का नाही ग्रामसेवक यांच्यावर कुणाचा दबाव आहे का? तात्पुरता माणूस घ्यायचा असल्यास सी. ओ ची परवानगी घ्यावी लागते मग ग्रामपंचायत स्तरावर घेतलेला व्यक्ती बोगस स्वरूपात घेतला आहे का? कारण ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक प्रकाश नांगरे व सरपंच वंदना डोळस व इतर सदस्य यांनी कायदेशीर नियम न पाळता केलेली भरती ही बोगस स्वरूपाचीच आहे, जर जाहिरात काढून १ वर्ष झाले आणि सदर जागेवर अर्ज आलेले असताना भरती प्रक्रिया का राबवली नाही हा प्रश्न पडतो, गेले दोन दिवसापूर्वी ग्रामसेवक प्रकाश नांगरे यांना संपर्क साधला असता ग्रामसेवक म्हणतात नविन भरती काढून प्रक्रिया राबवली जाणार आहे म्हणजे मागील एक वर्षात जी भरती काढली होती ती भरती बोगस होती का? की ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक सरपंच व सदस्यांनी शासनाची फसवणूक केली असाच प्रश्न पडतोय, जर भरती प्रक्रिया राबवली गेली नाही तर लवकरच यावर आमरण उपोषण करून प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीला भाग पाडू असा इशारा करत आहे.


COMMENTS