भाजपच्या एका जिल्हाध्यक्षावर एका तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी आता भाजपच्या संबंधित नेत्यावर पोलिसांची टांगती तलवार असणार आहे. ...
भाजपच्या एका जिल्हाध्यक्षावर एका तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी आता भाजपच्या संबंधित नेत्यावर पोलिसांची टांगती तलवार असणार आहे. पोलिसांनी त्या भाजपच्या नेत्यासह त्याच्या कुटुंबीयांवर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथील कुंडरकी पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. प्रकरणातील आरोपीचे नाव ब्रिजेश लोधी असे असून तो जिल्हामंत्री आहे.
भाजप नेत्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले लैंगिक शोषण
पीडितेच्या माहितीनुसार, ब्रिजेशने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर आरोप करण्यात आला की, या काळात ब्रिजेशने लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ब्रिजेश एवढ्यावरच न थांबता त्याने पीडितेचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. ब्रिजेशने पीडितेशी विवाह करण्यास नंतर नकार दिला. पीडितेला त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 95, 352 आणि 351 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
नंतर दुसऱ्याच तरुणीशी विवाह करण्यास झाला तयार
संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला, ब्रिजेशच्या कुटुंबीयांनी पीडितेला 15 दिवसांत ब्रिजेशशी विवाह करण्याचे आश्वासन दिले, मात्र नंतर फसवले. बराच काळ लोटून गेला असला तरीही ब्रिजेश अविवाहितच राहिला. मात्र, पीडितेला कळाले की 19 फेब्रुवारी 2026 रोजी ब्रिजेश हा विवाह करत आहे. तेव्हा पीडितेनं ब्रिजेशला जाब विचारला, तू माझ्याशी खोटं बोलला आणि आता दुसऱ्या मुलीशी विवाह करतोय, तेव्हा ब्रिजेशने तिला त्याच्याच घरी बोलावले. संबंधित प्रकरणात असा आरोप आहे की, ब्रिजेशच्या कुटुंबियांनी पीडितेची बॅग आणि मोबाईल हिसकावून घेत तिला अपमान केला आणि नंतर मारहाण केली.
दरम्यान, पीडितेच्या बॅगेत 20 हजार रुपये, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे आणि सोन्या-चांदीच्या वस्तू होत्या. या घटनेनंतर, पीडितेनं कायदेशीर कारवाई करत आरोपीच्या घरासमोर धरणे आंदोलन सुरु केले. तिला तात्काळपणे न्याय मिळाली नाही. नंतर पोलिसांनी तिच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून घेतला.


COMMENTS