प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर सुट्टीमध्ये मुलांना कशाप्रकारे गुंतवून ठेवावे हा प्रश्न पालकांना नेहमी सतावत असतो, यासाठी जुन्नर तालुक्या...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
सुट्टीमध्ये मुलांना कशाप्रकारे गुंतवून ठेवावे हा प्रश्न पालकांना नेहमी सतावत असतो, यासाठी जुन्नर तालुक्यातील माशेलकर स्वरूप स्पेस व इनोवेशन सेंटरच्या वतीने विद्यार्थ्यांचे कुतूहल जागृत ठेवून त्यांना विश्वापर्यंतची सर्व माहिती देण्यासाठी दोन दिवसाच्या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या केंद्राचे सचिव डॉ. रतिलाल बाबेल व उपाध्यक्ष डॉ. तानाजी वामन यांनी दिली.
दिनांक 16 मे व 17 मे 2026 या दोन दिवसात निवासी शिबिराचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी अंतराळ विज्ञानाची ओळख, अंतराळ विषयक माहितीपट, वायुगतिकी मूलतत्वे, अंतराळ मोहिमा, स्टेम (STEM) शिक्षण प्रणालीवर आधारित प्रत्यक्ष कृती उपक्रम, विश्वरचना, दुर्बिणीद्वारे आकाश निरीक्षणाची संधी, पृथ्वीबाहेरील मानवी जीवनाचे भविष्य या विषयावर वादविवाद व चर्चासत्र तर दुसऱ्या दिवशी कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रत्यक्ष प्रशिक्षण माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोवेशन सेंटरचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. प्रतिक मुणगेकर, उपाध्यक्ष डॉ. कल्पेश जाधव हे घेणार आहेत. तसेच दुसऱ्या दिवशी रॉकेट निर्मिती कार्यशाळा, मंगळ व चंद्र वसाहत सिम्युलेशन, अंतराळ प्रश्नमंजुषा या बाबी होणार आहेत. त्या विषयातील तज्ञ मार्गदर्शक दोन दिवस सहभागी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांना कृतीद्वारे शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे. एखादी संकल्पना पाठ न करता ती कृतीद्वारे केल्यामुळे अधिक समजून घेण्यासाठी हे निवासी शिबीर उपयोगी पडणार आहे. विद्यार्थ्यांना व पालकांना आपल्या मनातील शंका समाधानासाठी तज्ञांबरोबर वेळ राखून ठेवला आहे. सर्व सहभागींना आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रयोग करण्याची संधी मिळावी म्हणून मर्यादित जागा ठेवल्या असल्यामुळे ज्यांना सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी एप्रिल महिन्यापर्यंत डॉ. रतिलाल बाबेल (9860389956) व डॉ. तानाजी वामन ( 8830894453 ) यांच्याशी संपर्क करावा.


COMMENTS