दि.१४ एप्रिल २०२६ पश्चिम रेल्वे चर्चगेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले जयंतीदिनी.ट्रेन मॅनेजर व मोटरमेन ब्रॅंच ऑल इंडिया...
दि.१४ एप्रिल २०२६ पश्चिम रेल्वे चर्चगेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले जयंतीदिनी.ट्रेन मॅनेजर व मोटरमेन ब्रॅंच ऑल इंडिया एस सी/ एस टी एम्लॉइज असोसिएशन,चर्चगेट मुंबई पश्चिम रेल्वे येथे जयंती साजरी करण्यात आली तसेच लिखित श्री खंडू रघुनाथ माळवे डॉ खं र माळवे -खरमा यांचा हिंदी काव्यसंग्रह "असली सवेरा" प्रकाशित करण्यात आला. SC/ST चे झोनल अध्यक्षा आयु-शकुंतला वाव्हळ व मंडल सचिव विजय जगताप,मा.जे आर भोसले(झोनल सचिव)व मा .प्रशांत कानडे-(मंडल सचिव)-रेल्वे एम्प्लॉइज युनियन पदाधिकारी) उपस्थित रेल्वे अधिकारी यांचे हस्ते शिवाजी महाराज ,भगवान गौतम बुध्द मुर्तींचे बुध्द वंदना घेत पुजन करण्यात आले.
चर्चगेट हाॅलमधे सजावट केलेल्या उच्चासन ठिकाणी शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले,शाहु महाराज प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन पुजन करण्यात आले. यावेळी प्रमुख रेल्वे अधिकारी PCEE श्री गोएल सर, श्री दिनेश जैन CEE,मोटरमेन अधिकारी तसेच महिला अधिकारी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.आयोजक मा.विजय बनसोडे अध्यक्ष,मा.विकास शिंदे सेक्रेटरी,आर बी सोनवणे कोषाध्यक्ष,संयोजक मा.संजय अंबुलकर,मा.उदय कांबळे,मा. सुरेंद्र साखरे,मा.सुधाकर बि-हाडे,मा.सुधीर मेश्राम,मा.अभिजित रोकडे,मा.रघुनंदन सिंह,मा.विनोद बोरकर यांनी खुप मेहनत घेतली, संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.विकास शिंदे व मा.सुधीर मेश्राम यांनी तर प्रस्ताविक मा.संजय अंबुलकर यांनी केले, तसेच मा.सुरेंद्र साखरे यांनी सुरूवातीला सुरेख गाणे गाऊन मंत्रमुग्ध केले.सर्वांसाठी सहभोजन ठेवण्यात आले,कार्यक्रमात त्रिशरण पंचशील तसेच संविधानाची प्रस्तावना "आम्ही या देशाचे नागरिक "सार्वजनिक संपथविधी घेत सांगता करण्यात आले.



COMMENTS