पुणे : कपडे बदलत असताना मुली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, अन.... | CrimeNama
Loading ...

पुणे : कपडे बदलत असताना मुली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, अन....

  काही तरुणी एका कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. मात्र त्या दुकानात ट्रायल रुम नव्हती. त्यामुळे दुकानदाराने त्यांना कपडे बदलण्या...

 


काही तरुणी एका कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. मात्र त्या दुकानात ट्रायल रुम नव्हती. त्यामुळे दुकानदाराने त्यांना कपडे बदलण्यासाठी स्टोअर रुममध्ये जाण्यास सांगितले.

मात्र या स्टोअर रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे त्या मुलींना सांगण्यात आले नव्हते. मात्र ही गोष्ट मुलींच्या लक्षात आली आणि त्यांना धक्काच बसला.


'कपडे बदलण्यासाठी स्टोअर रुम वापरा'


ही घटना आहे पुण्याच्या कामशेत परिसरातील. येथील मुकेश फॅन्सी कॉर्नर नावाच्या कपड्याच्या दुकानात काही मुली खरेदीसाठी गेल्या होत्या. मात्र त्यांच्यासोबत पुढे काय होणार आहे याची पुसटशी कल्पनादेखील त्यांना नव्हती. दुकानात गेल्यावर त्यांनी ट्रायल रुमची चौकशी केली, मात्र त्या दुकानात ट्रायल रुमच नव्हती. त्यामुळे दुकानदार मुकेश मुथा याने कपडे बदलण्यासाठी त्यांना स्टोअर रुम वापरण्यास सांगितले. त्या मुली स्टोअर रुममध्ये गेल्या आणि कपडे बदलत असतानाच अचानक लाईट गेली. त्यामुळे अंधारात लाल दिवा चमकताना त्या मुलींना दिसला.

स्टोअर रुममधील लाईट गेली अन्..


हा लाल दिवा कशाचा आहे याची त्या मुलींनी बारकाईने तपासणी केली. यावेळी तो सीसीटीव्ही असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांना धक्काच बसला. यानंतर त्या मुलींनी रागाच्या भरात दुकानदाराला याचा जाब विचारला. मात्र माफी वगैरे न मागता उलट त्याने मुलींना धमकवायला सुरुवात केली. मात्र पीडित तरुणींनी हिंमत दाखवत कामशेत पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या प्रकाराविरोधात त्यांनी दुकानदार मुकेश मुथा विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी मुथाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 77 आणि 352 विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


मात्र यामध्येही एक महत्त्वाची बाब आहे. ती म्हणजे एफआयआर नोंदवण्यात पोलिसांनी केलेली दिरंगाई. ही घटना घडली 16 मार्च रोजी. मात्र त्यानंतर एफआयआर नोंदवण्यास विलंब का झाला असा प्रश्न विचारला जात आहे. इतकंच नाही तर महिलांच्या सुरक्षिततेबाबतच्या या गंभीर गुन्ह्यात मुथाला इतक्या लवकर जामीन कसा मिळाला याचे उत्तरही अनुत्तरित आहेत. या प्रकरणानंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आता होत आहे.

समाजासाठी धोक्याचा इशारा


पोलिसांवर होणार हे आरोप मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणामुळे मात्र महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा गैरवापर ही फक्त एक घटना नसून, संपूर्ण समाजासाठी तो एक धोक्याचा इशारा आहे.

COMMENTS

Name

Agriculture,83,Ahmednagar,86,Amaravati,20,Aurangabad,39,Breakin,1,Breaking,4360,Buldhana,17,Chandrapur,2,Cooking,4,Crime,1610,Dhule,14,Entertainmen,1,Entertainment,77,Gadchiroli,5,Health,469,India,819,Jalgaon,34,Jalna,19,Kolhapur,27,Lifestyle,348,Maharashtra,1860,Mumbai,456,Nagpur,57,Nashik,73,Politics,650,Pune,1966,Raigad,27,Ratnagiri,20,Sangali,36,Satara,50,Sindhudurg,5,Solapur,47,Sport,68,Technology,39,World,77,पुणे,2,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: पुणे : कपडे बदलत असताना मुली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, अन....
पुणे : कपडे बदलत असताना मुली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, अन....
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhstIyMfOqflVoCzscv9WGSB3svypm9oEmQWCyY9NbjYcaLZOflcwBqTUPE4z-TSaIOOetUtt9WPtC_pHYmndswdk44S-84RBosEjEziwxo9MJge3KDLXmu-97f4pV4pqhJjefPxPc0GODHsiFGJA5fpiwFrLibEAP0eQKnV832Bpm7wlQKC4gf1h4VB0I/s320/1002105836.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhstIyMfOqflVoCzscv9WGSB3svypm9oEmQWCyY9NbjYcaLZOflcwBqTUPE4z-TSaIOOetUtt9WPtC_pHYmndswdk44S-84RBosEjEziwxo9MJge3KDLXmu-97f4pV4pqhJjefPxPc0GODHsiFGJA5fpiwFrLibEAP0eQKnV832Bpm7wlQKC4gf1h4VB0I/s72-c/1002105836.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/04/blog-post_25.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/04/blog-post_25.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content