रायगड: प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या मानसिक तणावातून एका युवकाने जगाचा निरोप घेतल्याची घटना अलिबाग शहरातील रामनाथ परिसरात उघडकीस आली आहे....
रायगड: प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या मानसिक तणावातून एका युवकाने जगाचा निरोप घेतल्याची घटना अलिबाग शहरातील रामनाथ परिसरात उघडकीस आली आहे. अक्षय युवराज निकाळे (वय 30, मूळ रा. नाशिक) असे मृत युवकाचे नाव आहे.
अक्षय निकाळे याचे अलिबागमधील एका व्यापाऱ्याच्या मुलीसोबत मागील 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रेयसीने काही दिवसांपूर्वी लग्नासाठी नकार दिल्याने अक्षयला मोठा मानसिक धक्का बसला होता. या घटनेमुळे अक्षय मागील काही दिवसांपासून नैराश्यात होता. नाशिक येथील एका कौटुंबिक कार्यक्रमातून अलिबागला परतल्यानंतर, अक्षयने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाजवळ प्रेयसीचा फोटो आढळल्याने प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या मानसिक तणावातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


COMMENTS