बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल सय्यद अता हसनैन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सम्राट ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल सय्यद अता हसनैन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय चौधरी होते. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.
दरम्यान भाजप आमदारांची बैठकही सुरू झाली आहे. या बैठकीनंतर एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.
बिहारच्या राजकारणात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी घडामोडींना वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार निशांत कुमार हे बिहारचे उपमुख्यमंत्री होऊ शकतात. JDU पक्षातूनच उपमुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर मंत्रीमंडळात BJP मधून 14 आणि JDU मधून 15 मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच चिराग पासवान यांच्या पक्षाला देखील 2 मंत्री मंत्रीपदे दिले जाण्याचे सांगितले जात आहे. तर बिहार विधानसभा अध्यक्षवर दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असून JDU या पदासाठी कुठलाही तडजोड करण्यास तयार नाहीये.
कोण होणार मुख्यमंत्री?
नितीश कुमार यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर बिहारचा मुख्यमंत्री कोणार अशी चर्चा देशाच्या राजकारणात सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचा मुख्यमंत्री केला जाऊ शकतो तर उपमुख्यमंत्रीपदावर नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत कुमार यांची वर्णी लागू शकते. बिहारचे सध्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेण्याची शक्यता आहे.


COMMENTS