पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील रील स्टार अशी ओळख असणाऱ्या महिलेचा वाढदिवसाच्या दिवशीच मृतदेह कालव्यात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. भोसे ग...
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील रील स्टार अशी ओळख असणाऱ्या महिलेचा वाढदिवसाच्या दिवशीच मृतदेह कालव्यात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. भोसे गावातील सोनाली जाधव या रीलस्टारची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.
सोनाली जाधव हिचा विवाह झाला होता. मात्र, ती सध्या तिच्या माहेरी भोसे येत राहत होती.
भोसे येथे राहत असताना गावातील तुकाराम गावंधरे यांच्याशी तिचे प्रेम संबंध जुळून आले. मात्र प्रियकराने सोनाली वर चारित्र्याचा संशय घेऊन ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. सोन्याचे दागिन्यावरून झालेल्या वादात सोनालीचा गळा दाबला. यानंतर बेशुद्ध अवस्थेतील सोनालीला कालव्यात फेकून दिल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतल्याची माहिती असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली पतीपासून विभक्त राहत होती, ती आपल्या माहेरी भोसे येथे राहायला आली होती. गावातीलच तुकाराम गावंधरे याच्याशी प्रेमसंबंध जुळले. मात्र, प्रियकराने सोनाली वर चारित्र्याचा संशय घेऊन तिला संपवले. सोनाली दोन दिवस घरी न आल्याने तिच्या वडिलांनी करकंब पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दोन दिवसांनंतर रोपळे परिसरातील कालव्यात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मयत सोनालीच्या वडिलांनी हा मृतदेह सोनालीचाच असल्याची ओळख पटवली. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS