नवी मुंबई हे शहर व्यवस्थित नियोजन करून स्थापन करण्यात आले आहे. दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, कोपरी, तुर्भे, वाशी, सानपाडा, जुहीनगर, नेरुळ,...
नवी मुंबई हे शहर व्यवस्थित नियोजन करून स्थापन करण्यात आले आहे. दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, कोपरी, तुर्भे, वाशी, सानपाडा, जुहीनगर, नेरुळ, सीबीडी बेलापूर अशा भागांमुळे या शहराची वेगळी ओळख आहे.
ही ओळख अधिक स्पष्ट आणि दृश्यमान करण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवर अंतर दाखवणारे फलक (मैलाचे दगड) लावणे आवश्यक आहे. त्या फलकांवर प्रत्येक नोड्सचे नाव आणि त्याचे अंतर लिहिलेले असावे. यामुळे शहरात येणाऱ्या लोकांना योग्य मार्गदर्शन मिळेल.
तसेच मैलाचे दगड आकर्षक दिशादर्शक फलकांसह लावल्यास वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अधिक सोय होईल. विशेषतः मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेलगत नवी मुंबई असल्याने ठाणे, बेलापूर, शिळफाटा, मुंब्रा, ऐरोली या प्रमुख मार्गांवर तसेच शीव-पनवेल महामार्गावर असे फलक लावणे अधिक उपयुक्त ठरेल.
महापालिका अभियंता विभागाने याकडे लक्ष देऊन शहर अधिक सुंदर व सुबक दिसण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
तसेच प्रत्येक सेक्टर आणि गावठाण भागात आधीचे फलक व नकाशे नव्याने लावावेत, जेणेकरून नवीन लोकांना पत्ता शोधताना अडचण येणार नाही.
नोड्सनुसार क्षेत्रफळाची माहिती देणाऱ्या फलकांवर स्पष्टपणे माहिती नमूद करून हे फलक मुख्य चौकात आणि रस्त्यांवर लावल्यास लोकांना माहिती मिळण्यास मदत होईल आणि आपल्या शहराविषयी आपुलकी वाढेल.


COMMENTS