साई कला आविष्कार नाट्य संस्था, पुणे व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान,पुणे वतीने सलग 15 वी राज्यस्तरीय चित्ररंगभरण स्पर्धा बक्षीस...
साई कला आविष्कार नाट्य संस्था, पुणे व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान,पुणे वतीने सलग 15 वी राज्यस्तरीय चित्ररंगभरण स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ सायन्स पार्क नाट्यगृह,चिंचवड,पुणे 19 येथे आनंदी व उत्सवाच्या वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष-महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध चित्रकार व कवी श्री दिनेश चव्हाण (चाळीसगाव ) कार्यक्रमाचे उद्घाटक -सुप्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक डॉ.शांताराम कारंडे ( मुंबई)
विशेष अतिथी मा. श्री प्रवीण तुपे साहेब
( संस्थापक संचालक -सायन्स पार्क, चिंचवड), प्राध्यापक राजेंद्र सोनवणे, युवा उद्योजक स्वप्निल डुकरे, उद्योजक तानाजी थोरात, युवा नेते जगदीश लाड, संदीप लिंगायत इ. मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम प्रमुख पाहुणे
.मा.श्री.दादाजी पगार (नाशिक),मा. श्री.जेकब कोशी ( पुणे),मा सौ अमृता कुलकर्णी (सोलापूर ),मा श्री वसंत मोरे (भोसरी ),मा श्री डॉ. सुनील गायकवाड ( जळगाव ),मा. सौ. मथुरा कोळी ( मंगळवेढा),मा. सौ. वृषाली बिरारी( नाशिक)यावेळी उपस्थित होते.
यावेळी उद्घाटन रिबन कट करून व वृक्षाला पाणी घालून डॉ शांताराम कारंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटनपर भाषणात डॉ. शांताराम कारंडे म्हणाले की," अनेक संस्था समाजामध्ये काम करतात परंतु एवढं प्रामाणिक आणि भव्य स्वरूपाचं काम कोणी करत नाही ही संस्था गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण काम करत आहे. आमच्यामध्ये एक मैत्रीचा निखळ धागा जोडला गेला आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यातील कलाकार जागृत करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला आहे. आयुष्यामध्ये उत्तम चित्रकार कलाकार यातून घडतील असे आशा आहे. संस्थेच्या विविध उपक्रमाला आमच्या सदैव शुभेच्छा. "
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध चित्रकार दिनेश चव्हाण म्हणाले की, " जीवनाची प्रगती करण्यासाठी आपण एक तरी कला शिकली पाहिजे कला आपल्या जीवनाला एक वेगळे वळवळण देते. भविष्यातील उत्तम कलाकार आणि उत्तम चित्रकार या स्पर्धेच्या माध्यमातून घडल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. या भव्य सोहळ्यासाठी घेतलेल्या सर्वांची मेहनत सहज लक्षात येते. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेला मिळालेल्या उत्तम प्रतिसाद हेच या स्पर्धेचे यश आहे. सर्व मुख्याध्यापक, कलाशिक्षक,विद्यार्थी व पालक यांच्या मी मनापासून अभिनंदन करत आहे. कलाकाराकडे एक समाज जिवंत ठेवण्याचे आत्मभान असते. कलाकाराचा आत्मा आज जिवंत ठेवण्याचे काम अशा संस्था करत आहे. "
यावेळी शांताराम कारंडे लिखित " अंधारातील सत्य" लेखसंग्रह, कवी वादळकार यांनी संपादित केलेला "पाणी " प्रतिनिधी कविता संग्रहाचे प्रकाशन तसेच प्रा. राजेंद्र सोनवणे लिखित "सुविचार संग्रह 2025" या सुवचनाच्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये प्रथम क्रमांक प्रा दिनेश भदाणे, (लोहगाव पुणे )द्वितीय क्रमांक- तेजस कासार (रत्नागिरी ), तृतीय क्रमांक - धनश्री काकड (बुलढाणा ), अदिती चौधरी (धुळे )यांनी पटकावला. त्यांना स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र गुलाबपुष्प देऊन आले.
अतिशय सन्मानपूर्वक असा महाराष्ट्रातील संपूर्ण राज्यातून आलेल्या मुख्याध्यापक व कलाशिक्षक यांना
सन्मानचिन्ह,सन्मानपत्र गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.
तसेच राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी वर्गांचे "आविष्कार रंग "या विजेत्या चित्रांचे प्रदर्शन यावेळेस भरवण्यात आले होते. शालेय स्तरावर विजेते झालेल्या प्रत्येकी तीन गटातील, प्रत्येक तीन विद्यार्थ्यांना आकर्षक फोर कलर सन्मानपत्र, गोल्ड मेडल देऊन पाहुण्यांच्या शुभहस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
सलग पाच तास चालणाऱ्या या कार्यक्रमाचा समारोप विश्वगीत पसायदानाने करण्यात आला.
कार्यक्रमाचे बहारदार व धारदार सूत्रसंचालन कवयित्री सौ.रूपा भालेराव यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन नवनाथ पोकळे यांनी मानले.
भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये शिवबा ट्रॉफी नितीन सावंत,बालाजी थोरात, सुनिल पोटे ,कु. जुली यादव, प्रमोद डोंगरदिवे, सुरेशचंद्र चनाल, संदीप लिंगायत, साईराजे सोनवणे, श्रीकांत जाधव, संतोष जाधव, प्रशांत निकम, विवेक तायडे, अरुण थोरात,आशिष वर्मा, सिद्धांत सावंत यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
या कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन-साई कला आविष्कार संस्था, पुणे चेअरमन-प्रा राजेंद्र दशरथ सोनवणे(कवी -वादळकार, पुणे) व प्रमुख मार्गदर्शक सुप्रसिद्ध उद्योजक श्री कृष्णकुमार गोयल (चेअरमन- कोहिनूर ग्रुप पुणे) यांचे लाभले आहे.
पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवन कार्यावर चित्र रंगभरण स्पर्धा घेण्याचा संकल्प करण्यात आला.


COMMENTS