इराण इस्राईल युद्धाचा मोठा फटका भारताला बसला असून गॅस सिलेंडरचा तुटवडा संपूर्ण देशात जाणवत आहे. भारत हा सर्वाधिक गॅस आखाती देशातून आयात कर...
इराण इस्राईल युद्धाचा मोठा फटका भारताला बसला असून गॅस सिलेंडरचा तुटवडा संपूर्ण देशात जाणवत आहे. भारत हा सर्वाधिक गॅस आखाती देशातून आयात करत असल्याने गॅस पुरवठा काहीसा खंडित झाल्याचे चित्र आहे.
त्यामुळे आपल्याला गॅस सिलेंडर मिळेल कि नाही या भीतीपोटी अनेकजण गॅस वितरण केंद्राबाहेर गर्दी करू लागलेत. त्यातच आता LPG गॅस सिलेंडर वापरणाऱ्या सर्वांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
एलपीजी कंपन्यांनी सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हा निर्णय घरगुती गॅसचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी घेण्यात आला आहे. नव्या नियमामुळे आता १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरसाठी बुकिंग करताना ग्राहकांना जास्त दिवस वाट पाहावी लागणार आहे. पूर्वी हा कालावधी २५ दिवसांचा होता, परंतु आता तो वाढवून ३५ दिवस करण्यात आला आहे. LPG Gas Cylinder
हा बदल विशेषतः शहरात राहणाऱ्या आणि दोन सिलेंडर (डबल कनेक्शन) वापरणाऱ्या कुटुंबांवर जास्त परिणाम करणार आहे. अशा ग्राहकांना आता मागील सिलेंडर मिळाल्यानंतर पुढचा सिलेंडर बुक करण्यासाठी कमीत कमी ३५ दिवस थांबावे लागेल.
ग्राहकांच्या प्रकारानुसार नवीन नियम
उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत असलेल्या ग्राहकांना पुढील सिलेंडरसाठी तब्बल ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल.
सिंगल सिलेंडर (एकच सिलेंडर असलेले) ग्राहक २५ दिवसांनी नवीन बुकिंग करू शकतात. तर डबल सिलेंडर (दोन सिलेंडर असलेले) ग्राहकांसाठी बुकिंगचा कालावधी ३५ दिवस निश्चित करण्यात आला आहे.
५ किलो सिलेंडर असलेल्या ग्राहकांना ९ ते १६ दिवसांनी बुकिंग करता येणार आहे तर १० किलो सिलेंडर असलेल्या ग्राहकांना १८ ते ३२ दिवसांनी बुकिंग करता येणार आहे. LPG Gas Cylinder
या नवीन नियमातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील बुकिंगची मोजणी शेवटच्या डिलिव्हरीच्या तारखेपासून केली जाईल. म्हणजेच, जर एखाद्या ग्राहकाने अंतिम मुदतीपूर्वी सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न केल्यास, ते ‘अर्ली बुकिंग’ सिस्टीमद्वारे ब्लॉक केले जाईल आणि बुकिंग स्वीकारले जाणार नाही.
या नवीन नियमासंदर्भात ग्राहकांना काही समस्या आल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास, ते अधिकृत टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक 1800-2333-555 वर संपर्क साधू शकतात.


COMMENTS