देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तूर्तास कोणतीही वाढ होणार नाही, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा ...
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तूर्तास कोणतीही वाढ होणार नाही, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
किरकोळ विक्रीचे दर वाढवले जाणार नाहीत आणि शक्य झाल्यास रशियाकडून एलएनजी (LNG) खरेदी केली जाईल, असंही सरकारनं म्हटलं आहे.
यासोबतच, सौदी अरेबियातील यनबू (Yanbu) येथून इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (Indian Oil Corporation) कच्च्या तेलाचा एक कार्गो बुक केला असल्याची माहितीही सरकारने दिली.
सरकारने कच्च्या तेलाच्या आयातीची आकडेवारीही सादर केली. त्यानुसार, फेब्रुवारी महिन्यातही भारताने सर्वाधिक तेल रशियाकडूनच खरेदी केलं. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत आयातीत तब्बल २०% वाढ झाली आहे. जिथून कुठे कच्चं तेल उपलब्ध होईल, तिथून ते खरेदी केलं जाईल आणि यासाठी फक्त राष्ट्रीय हिताचा विचार केला जाईल, असं सरकारचं धोरण आहे.
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात, असे संकेत मिळत होते. मात्र, सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.


COMMENTS