17 वर्षीय मुलीने प्रियकरासाठी आईलाच संपवले, बेडरुममध्ये पुरला मृतदेह; वर्षभरानंतर 'असं' प्रकरण आलं बाहेर... | CrimeNama
Loading ...

17 वर्षीय मुलीने प्रियकरासाठी आईलाच संपवले, बेडरुममध्ये पुरला मृतदेह; वर्षभरानंतर 'असं' प्रकरण आलं बाहेर...

गेल्या एका वर्षापासून बेपत्ता असलेल्या 40 महिलेचा सांगाडा चक्क तिच्याच बेडरूममध्ये जमिनीखाली सापडला. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेची 17 वर्ष...



गेल्या एका वर्षापासून बेपत्ता असलेल्या 40 महिलेचा सांगाडा चक्क तिच्याच बेडरूममध्ये जमिनीखाली सापडला. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेची 17 वर्षीय मुलगी आणि तिचा 22 वर्षीय प्रियकर यांना ताब्यात घेतले आहे.

हत्येचा हा कट रचून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घरातच गाडून त्यावर सिमेंटचे पक्के बांधकाम केले होते. तेलंगणमधील हैदराबाद येथील जवाहरनगर भागात ही धक्कादायक घटना उघडकीस आली.


आई बेपत्ता झाल्याची तक्रार


घटनेची पार्श्वभूमी अशी की, अंजू दासारी या घरकाम करून आपल्या दोन मुलींसह राहत होत्या. 17 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांची मोठी मुलगी रोशनी कुमारी हिने आई बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. आई कामावर गेल्यावर परतलीच नाही, असे तिने तक्रारीत म्हटले होते. सुरुवातीला पोलिसांनी हा बेपत्ता झाल्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला, मात्र अनेक महिने उलटूनही अंजू यांचा कोणताही थांगपत्ता लागत नव्हता.

प्रेमातला अडसर दूर करण्यासाठी भयानक कट


तपासादरम्यान पोलिसांना अंजू यांच्या धाकट्या मुलीच्या वागण्यावर आणि जबाबावर संशय आला. तिने प्रत्येक वेळी चौकशीत वेगवेगळी माहिती दिल्याने पोलिसांचे संशयाचे सुई तिच्याकडे वळली. पोलिसांनी जेव्हा तिचे कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा ऑटो चालक माँटी कुमार सिंह याच्याशी तिचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. या दोघांच्या लग्नाला अंजू दासारी यांचा कडाडून विरोध होता, हाच विरोधाचा राग मनात धरून मुलीने प्रियकराच्या मदतीने आईचा काटा काढण्याचे ठरवले.

बेडरुममध्येच खड्डा खणून पुरला मृतदेह


17 मार्च रोजी पोलिसांनी माँटी आणि अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी सांगितले की, हत्येनंतर दुर्गंधी येऊ नये आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी बेडरूममध्येच खड्डा खणून मृतदेह पुरला आणि वरून पक्के काँक्रीट केले. बुधवारी फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत पोलिसांनी बेडरूम खोदून मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले. सध्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास करत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4080,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1487,Dhule,14,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,451,India,738,Jalgaon,32,Jalna,17,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1769,Mumbai,427,Nagpur,51,Nashik,68,Politics,617,Pune,1915,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: 17 वर्षीय मुलीने प्रियकरासाठी आईलाच संपवले, बेडरुममध्ये पुरला मृतदेह; वर्षभरानंतर 'असं' प्रकरण आलं बाहेर...
17 वर्षीय मुलीने प्रियकरासाठी आईलाच संपवले, बेडरुममध्ये पुरला मृतदेह; वर्षभरानंतर 'असं' प्रकरण आलं बाहेर...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiLdQxMFhgc7jjgvpJ4xcDfT44LgDvu3de5ablREQlJ9v73R7sHVBwSH1svlxuC1GwpMkONziIJK_x_KcVY_HisPyQfFqcQXb8zOewp0je87PYId_r8SilAcTOG5_IM4o-8gvL1xjGMHAWu5POXYPxY0Wtp98Qq-AgalHy_IcZJ76YBgmbJ47qOxTQ4ni4/s320/1002055034.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiLdQxMFhgc7jjgvpJ4xcDfT44LgDvu3de5ablREQlJ9v73R7sHVBwSH1svlxuC1GwpMkONziIJK_x_KcVY_HisPyQfFqcQXb8zOewp0je87PYId_r8SilAcTOG5_IM4o-8gvL1xjGMHAWu5POXYPxY0Wtp98Qq-AgalHy_IcZJ76YBgmbJ47qOxTQ4ni4/s72-c/1002055034.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/03/17.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/03/17.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content