'VIP रूम'मध्ये हिडन कॅमेरा, 200 हून अधिक जोडप्यांचे प्रायव्हेट क्षण रेकॉर्ड अन्... | CrimeNama
Loading ...

'VIP रूम'मध्ये हिडन कॅमेरा, 200 हून अधिक जोडप्यांचे प्रायव्हेट क्षण रेकॉर्ड अन्...

उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणामुळे प्रायव्हसी आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झा...



उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणामुळे प्रायव्हसी आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. वृत्तानुसार, प्रेमी युगुलांना शहरातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये, 'व्हीआयपी रूम' नावाची सुविधा पुरवली जायची.

त्या प्रायव्हेट रूमच्या नावाखाली, संबंधित जोडप्यांचे खाजगी तसेच रोमॅन्टिक क्षण रेकॉर्ड केले जायचे आणि त्या व्हिडीओच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करण्याचं घृणास्पद काम सुरू असायचं.


जोडप्यांसाठी 'व्हीआयपी रूम'


मिळालेल्या माहितीनुसार, त्या रेस्टॉरंटमध्ये पायऱ्यांखाली एक खास केबिन होती, ज्याला रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी 'व्हीआयपी रूम' असं नाव दिलं होतं. रेस्टॉरंटमध्ये आलेल्या जोडप्यांना कर्मचारी त्या खास 'व्हीआयपी रूम'ची वैशिष्ट्ये सांगायचे आणि त्यातील गोपनीयतेचे आमिष दाखवायचे. या खास केबिनसाठी संबंधित जोडप्यांना 1500 ते 200 रुपये आकारले जात होते. त्या रूममध्ये त्यांना कोणीही पाहणार नाही, अशी ग्राहकांना खात्री दिली जायची. पण प्रत्यक्षात तिथे एक हिडन कॅमेरा बसवण्यात आला होता.


रूममध्ये हिडन कॅमेरा अन् जोडप्यांचे प्रायव्हेट व्हिडिओ...


अशाच पद्धतीने, 4 फेब्रुवारी रोजी एक जोडपे त्या रेस्टॉरंटमध्ये आले आणि त्यावेळी त्यांना सुद्धा कर्मचाऱ्यांनी 'व्हीआयपी रूम'बद्दल सांगून प्रायव्हेट वेळ घालवण्याचं आमिष दाखवलं. कर्मचाऱ्यांच्या आमिषाला बळी पडून संबंधित जोडप्याने रेस्टॉरंटमधील ती 'व्हीआयपी रूम' बुक केली. परंतु, त्या जोडप्याला खोलीत काहीतरी संशयास्पद आढळलं. त्यानंतर, त्यांनी लगेच सतेंद्र नावाच्या रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याला पकडलं आणि त्याचा मोबाईल चेक केला. मोबाईल चेक करताना सर्वांनाच धक्का बसला. त्यात 200 हून अधिक जोडप्यांचे प्रायव्हेट व्हिडिओ सापडले. दरम्यान, रेस्टॉरंटमध्ये गोंधळ वाढला आणि तातडीने पोलिसांना या प्रकरणाबाबत कळवण्यात आलं. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली.

पोलिसांनी दिली माहिती...


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंटमधून जप्त केलेल्या डीव्हीआरच्या तपासणीत अनैतिक कृत्यांचे भक्कम पुरावे समोर आले. कर्मचाऱ्यांनी जोडप्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांच्या प्रायव्हेट क्षणांच्या व्हिडिओचा वापर केला. बदनामीच्या भीतीने पीडित जोडपे पुढे आले नसले तरी, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, रेस्टॉरंट तात्काळ सील करण्यात आलं असून त्याचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना अहवाल पाठवण्यात आला आहे. सध्या, फरार आरोपी कर्मचारी सतेंद्रला अटक करण्यासाठी पोलीस छापे टाकत असल्याची माहिती आहे. या खुलाशामुळे बिजनोरमधील रेस्टॉरंटला व्हिजिट करणाऱ्या लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

COMMENTS

Name

Agriculture,77,Ahmednagar,86,Amaravati,19,Aurangabad,37,Breakin,1,Breaking,4271,Buldhana,16,Chandrapur,2,Cooking,3,Crime,1585,Dhule,14,Entertainmen,1,Entertainment,65,Gadchiroli,5,Health,461,India,804,Jalgaon,32,Jalna,18,Kolhapur,27,Lifestyle,344,Maharashtra,1816,Mumbai,446,Nagpur,56,Nashik,71,Politics,630,Pune,1951,Raigad,27,Ratnagiri,19,Sangali,36,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,47,Sport,67,Technology,39,World,72,पुणे,2,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: 'VIP रूम'मध्ये हिडन कॅमेरा, 200 हून अधिक जोडप्यांचे प्रायव्हेट क्षण रेकॉर्ड अन्...
'VIP रूम'मध्ये हिडन कॅमेरा, 200 हून अधिक जोडप्यांचे प्रायव्हेट क्षण रेकॉर्ड अन्...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjfcIDk4L0iwXTzPd_z0Gzk7cBLakrmGCvMDAGqcUq7N5OjPrHLgTY_yd7SJhdrMtVR0U5kM-Rl2HupAK8FuG-qCkfg8oH03FY5cktznx3rVJpemvLyj3GMabIPXGklyTGAj2H3LLrYEvOzeSeQ7GomrHQjSWBpAdnUeqc96af7zN7CkV1kx79eUBg_aYw/s320/1001871327.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjfcIDk4L0iwXTzPd_z0Gzk7cBLakrmGCvMDAGqcUq7N5OjPrHLgTY_yd7SJhdrMtVR0U5kM-Rl2HupAK8FuG-qCkfg8oH03FY5cktznx3rVJpemvLyj3GMabIPXGklyTGAj2H3LLrYEvOzeSeQ7GomrHQjSWBpAdnUeqc96af7zN7CkV1kx79eUBg_aYw/s72-c/1001871327.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/02/vip-200.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/02/vip-200.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content