प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर जुन्नर :श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर,भूगोल विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,विद्यार्थी वि...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर :श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर,भूगोल विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,विद्यार्थी विकास विभागातर्फे 'कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनुप्रयोग' या विषयावर दि १७ फेब्रुवारी २०२६ रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे व अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी यांनी कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाघमारे होते. तसेच विज्ञान आश्रम,पाबळ येथील डिझाइन इनोव्हेशन सेंटर समन्वयक डॉ यशवंत प्रसाद व त्यांचे प्रकल्प सहाय्यक श्रेयस मलोदे व जयहिंद इंजिनीरिंग कॉलेज कुरण येथील डाटा सायंटिस्ट प्रा चंद्रशेखर कोळसे व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील मृदा शास्त्रज्ञ प्रा योगेश यादव आणि शेती शास्त्रज्ञ डॉ.सुयोग खोसे,तसेच विद्यार्थी विकास अधिकारी प्रा विक्रम रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. आपल्या बीज भाषणात मृदा शास्त्रज्ञ योगेश यादव यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून वेळ व श्रम वाचवून पिकांचे उत्पादन वाढवणे शक्य होईल असे मत मांडले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ महादेव वाघमारे यांनी शाश्वत विकासासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर भविष्यासाठी वरदान ठरून कृषीक्षेत्राला नवसंजिवनी देणारा आहे,असे विधान केले.या कार्यशाळेत डॉ यशवंत प्रसाद यांनी शेती क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाची अंमलबजावणी याबाबत माहिती दिली.श्रेयश मलोदे यांनी शेती क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाच्या वापराचे प्रात्यक्षिक यावर माहिती दिली,तसेच चंद्रशेखर कोळसे यांनी शाश्वत विकासासाठी सूक्ष्म शेती व आधुनिक शेतीतील स्मार्ट तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर व्याख्यान दिले. योगेश यादव यांनी माती व पाणी व्यवस्थापन,डॉ.सुयोग खोसे यांनी कृषी क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाचा वापर यावर व्याख्यान दिले. या कार्यशाळेमध्ये एकूण १०९ विद्यार्थ्यांनी व बहुसंख्य प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ.अशोक दुशिंग यांनी केले.सूत्रसंचालन प्रा संतोष गवळी तर आभार डॉ महेंद्र कोरडे यांनी मानले. आयक्यूएसी समन्वयक डॉ विनायक लोखंडे तसेच प्रा.निलेश घोगरे,प्रा संदिप थोरवे,श्री महादेव सोनवणे,श्री योगेश मस्करे,श्री कुमार सूर्यवंशी,श्री मितेश गाडेकर,श्री सिताराम शेळकंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.




COMMENTS