नवरा परदेशात, सासऱ्याचा गळा चिरला, व्हिडिओ केला अन्.. | CrimeNama
Loading ...

नवरा परदेशात, सासऱ्याचा गळा चिरला, व्हिडिओ केला अन्..

  एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून सासऱ्याची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपींनी हत्या करत...

 


एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून सासऱ्याची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपींनी हत्या करतानाचा व्हिडीओदेखील बनवला. सुबचन राजभर असं मृत सासऱ्याचं नाव असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील ही घटना आहे. 1 फेब्रुवारीच्या रात्री सुबचन राजभर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी मृत सुबचन यांची सून पिंकी राजभर, तिचा प्रियकर राममिलन राजभर आणि त्याचे दोन साथीदार सुधीर व रोहित यांना अटक केली आहे. हत्येसाठी वापरलेला चाकूदेखील पोलिसांनी जप्त केला आहे.

प्रेमप्रकरणामुळे सासरा आणि सुनेत वाद


2 फेब्रुवारीच्या सकाळी एका आंब्याच्या बागेत सुबचन राजभर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्यांचा गळा चिरुन खून करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपासासाठी अनेक पथके तयार केली होती. तपासा दरम्यान समोर आले की, पिंकीचा पती चंदन गेल्या दोन वर्षांपासून नोकरीनिमित्त परदेशात आहे. या दरम्यान पिंकीचे राममिलनसोबत प्रेमसंबंध जुळले होते. सासरा सुबचन यांना या प्रेमसंबंधाविषयी समजले होते. यावरुन सुबचन आणि पिंकीमध्ये सतत वाद होत होते.


हत्या आणि व्हिडीओ


पिंकीने तिचा प्रियकर राममिलनला सांगितले की, तिचे सासरे तिला त्रास देत आहेत आणि त्यांना संपवण्याची गळ घातली. नियोजित कटानुसार, राममिलन आणि त्याच्या दोन साथीदारांनी सुबचन यांना दारु पिण्याच्या बहाण्याने गावातील ट्यूबवेलजवळ बोलावले. याठिकाणी आरोपींनी सुबचन यांचे तोंड दाबून चाकूने त्यांचा गळा चिरला. धक्कादायक म्हणजे, गुन्हा करताना त्यांनी मोबाईलवर व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला, जो पोलिसांनी आता जप्त केला आहे.

पिंकीचा सासऱ्यावर आरोप


पिंकीने चौकशीदरम्यान असा आरोप केला आहे की, सासरे सुबचन तिला आणि तिच्या मुलांना वारंवार मारहाण करत असत आणि त्यांची तिच्यावर वाईट नजर होती. त्यामुळेच तिने प्रियकराच्या मदतीने हा टोकाचा निर्णय घेतला. दुसरीकडे, प्रियकर राममिलनने सांगितले की, 'तो आणि पिंकी गेल्या दीड वर्षांपासून संपर्कात होते. पिंकीला तीन मुले आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यावर लग्नाचा विचार करू' असेही त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात खुनात वापरण्यात आलेले शस्त्र, मृताचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली बाईक जप्त केली आहे. सर्व चारही आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3703,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1182,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,517,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,295,Maharashtra,1690,Mumbai,407,Nagpur,47,Nashik,56,Politics,601,Pune,1861,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,41,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: नवरा परदेशात, सासऱ्याचा गळा चिरला, व्हिडिओ केला अन्..
नवरा परदेशात, सासऱ्याचा गळा चिरला, व्हिडिओ केला अन्..
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhOjnmbqsHHbsOI4TQfUxKz54PnTo-QwjBCqnAmAOairws6vPYPX5IcvL7MPCl3QnRPIOPeiyFtitrsiK1XRXxvJJLVq1coSB2IWD42vgfInPBm_JPZ9lQmQvk9bJdqnA2C-Af52GQ5pcLLA2izyWgD-Ov6xRtt0EFmIAqMmG90MI6P6LC8u-PsVey0TcE/s320/1001852670.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhOjnmbqsHHbsOI4TQfUxKz54PnTo-QwjBCqnAmAOairws6vPYPX5IcvL7MPCl3QnRPIOPeiyFtitrsiK1XRXxvJJLVq1coSB2IWD42vgfInPBm_JPZ9lQmQvk9bJdqnA2C-Af52GQ5pcLLA2izyWgD-Ov6xRtt0EFmIAqMmG90MI6P6LC8u-PsVey0TcE/s72-c/1001852670.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/02/blog-post_5.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/02/blog-post_5.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content