तृतीयपंथीयाचे लिंग परिवर्तन करुन बलात्कार, बहिणीच्या नवऱ्याचं कृत्य. | CrimeNama
Loading ...

तृतीयपंथीयाचे लिंग परिवर्तन करुन बलात्कार, बहिणीच्या नवऱ्याचं कृत्य.

  एका तृतीयपंथीय व्यक्तीने आपल्या बहिणीच्या नवऱ्यावर बलात्कार, आर्थिक शोषण आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. आरोपीने सोबत राहण्याचे अमिष द...

 


एका तृतीयपंथीय व्यक्तीने आपल्या बहिणीच्या नवऱ्यावर बलात्कार, आर्थिक शोषण आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. आरोपीने सोबत राहण्याचे अमिष दाखवून पीडित तृतीयपंथीय व्यक्तीचे लिंग परिवर्तन करण्यास भाग पाडले.

मात्र आता आरोपीचे मेहुणीसोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर त्याने पीडित तृतीयपंथीय व्यक्तीला सोडून दिले आहे. यामुळे नाराज पीडितेने पोलिस स्टेशन गाठले. नात्याला काळिमा फासणारी ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

आयुष्यभर सोबत राहण्याचे आश्वासन


उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील ही घटना आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, 2018 मध्ये वडिलांच्या निधनानंतर तिला अनुकंपा तत्त्वावर नगरपालिकेत नोकरी मिळाली. याच काळात तिची ओळख आरोपीशी झाली. आरोपी मटणाचे दुकान चालवतो आणि तो चार मुलांचा बाप आहे. आरोपीने लग्नाचे आणि आयुष्यभर सोबत राहण्याचे खोटे आश्वासन देऊन पीडितेवर अत्याचार केले. इतकेच नाही तर, मार्च 2023 मध्ये दिल्लीला नेऊन सुमारे 7 लाख रुपये खर्च करून तिचे लिंग परिवर्तन घडवून आणले.


पीडितेचे आर्थिक शोषण


आर्थिक शोषणाबाबत माहिती देताना पीडितेने सांगितले की, गेल्या अडीच ते तीन वर्षांत आरोपी आणि त्याच्या पत्नीने मिळून तिचे वेतन आणि 'बधाई' मधून मिळणारे सर्व पैसे हडप केले. घरखर्च आणि इतर गरजांच्या नावाखाली आतापर्यंत सुमारे 20 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने आरोपीने लाटल्याचा आरोप आहे. पीडितेने या आर्थिक व्यवहारांचे काही पुरावे देखील पोलिसांकडे सुपूर्द केले असून, आरोपीने केवळ पैशांसाठी तिचा वापर केल्याचे तिचे म्हणणे आहे.

मेहुणीसोबत प्रेमसंबंध


धक्कादायक बाब म्हणजे, सुरुवातीला आरोपीच्या पत्नीला या संबंधांवर कोणताही आक्षेप नव्हता. मात्र, सहा महिन्यांपूर्वी आरोपीच्या पत्नीने आपल्या सख्या बहिणीला घरी आणले. आता आरोपीचे त्याच्या मेहुणीशी संबंध असून त्याने पीडितेला घराबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

COMMENTS

Name

Agriculture,77,Ahmednagar,86,Amaravati,19,Aurangabad,37,Breakin,1,Breaking,4271,Buldhana,16,Chandrapur,2,Cooking,3,Crime,1585,Dhule,14,Entertainmen,1,Entertainment,65,Gadchiroli,5,Health,461,India,804,Jalgaon,32,Jalna,18,Kolhapur,27,Lifestyle,344,Maharashtra,1816,Mumbai,446,Nagpur,56,Nashik,71,Politics,630,Pune,1951,Raigad,27,Ratnagiri,19,Sangali,36,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,47,Sport,67,Technology,39,World,72,पुणे,2,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: तृतीयपंथीयाचे लिंग परिवर्तन करुन बलात्कार, बहिणीच्या नवऱ्याचं कृत्य.
तृतीयपंथीयाचे लिंग परिवर्तन करुन बलात्कार, बहिणीच्या नवऱ्याचं कृत्य.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjvzgpq0d1uhESmkZyHvk7dLxzqx9-PXyFgQ4Qxsx1VrQxir0wAt-6z0zCU1PWw-d_T4zHXoQdzV9Ys5p89q6Ob-8msE0G54qdqVEoJNIVNpv6Ux3ga9L-pMbkS19ecVw3cnoJjKdgoZgLffVE6CA8a-MNKiUwtmB0Mhg2lljl5Ear-c8VjKoKXM7YkD9k/s320/1001909339.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjvzgpq0d1uhESmkZyHvk7dLxzqx9-PXyFgQ4Qxsx1VrQxir0wAt-6z0zCU1PWw-d_T4zHXoQdzV9Ys5p89q6Ob-8msE0G54qdqVEoJNIVNpv6Ux3ga9L-pMbkS19ecVw3cnoJjKdgoZgLffVE6CA8a-MNKiUwtmB0Mhg2lljl5Ear-c8VjKoKXM7YkD9k/s72-c/1001909339.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/02/blog-post_41.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/02/blog-post_41.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content