इंस्टाग्रामवर पत्नीचा प्रियकरासोबत फोटो पाहिला अन् वाद टोकाला पोहचला... | CrimeNama
Loading ...

इंस्टाग्रामवर पत्नीचा प्रियकरासोबत फोटो पाहिला अन् वाद टोकाला पोहचला...

  सोशल मीडियावर सुरू झालेल्या अनैतिक प्रेमसंबंधामुळे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही बिहारच्या...

 


सोशल मीडियावर सुरू झालेल्या अनैतिक प्रेमसंबंधामुळे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये घडली असून येथील नगर पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी (3 फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास पान मसाला दुकानदार मनोज कुमार यांची गळा चिरून हत्या करण्यात आली.

या प्रकरणात पोलिसांनी मृताची पत्नी निशू कुमारी हिला अटक केली असून तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


इंस्टाग्रामवर पत्नीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध...


मिळालेल्या माहितीनुसार, मृताच्या पत्नीचे तिच्या शेजारी राहणाऱ्या मिंटू कुमार नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. इंस्टाग्रामच्या माध्यमातूनच त्यांची एकमेकांसोबत ओळख झाली होती. वृत्तानुसार, मनोजच्या पत्नीने इंस्टाग्रामवर तिच्या प्रियकरासोबतची स्टोरी पोस्ट केली होती आणि त्यावरूनच तिचा तिच्या पतीशी मोठा वाद झाला. या भांडणानंतर, पत्नी घर सोडून गेली. घटनेच्या दिवशी, पीडित मनोजला फोन करून घराबाहेर बोलवण्यात आलं. त्यानंतर, पती लगेच घराच्या बाहेर गेला मात्र, त्यावेळी आरोपींनी धारदार शस्त्राने त्याची गळा चिरून निर्घृण हत्या केली. घटनेनंतर, परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं.

या प्रकरणासंबंधी मृताच्या आई आणि मामीने मनोजच्या पत्नीवर त्याची हत्या केल्याचा आरोप केला. त्यानंतर, नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी एफएसएल टीमच्या मदतीने घटनेचा तपासही सुरू केला आहे. सध्या, या घटनेतील आरोपी पत्नी पोलिसांच्या अटकेत असून तिचा प्रियकर मिंटू कुमार आणि मृताच्या मेहुण्याला अटक करण्यासाठी पोलीस छापे टाकत आहेत.

पोलिसांनी दिली माहिती


या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारी रोजी नगर पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर, मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेच्या तपासासाठी एफएसएल टीमची देखील मदत घेण्यात आली. मृताच्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचं तपासात समोर आलं. घटनेच्या दिवशी, पत्नीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोवरून तिचा तिच्या पतीसोबत वाद झाला. या भांडणानंतर, पत्नी घर सोडून निघून गेली. त्यानंतर, रात्री उशीरा पतीला फोन करून घराबाहेर बोलवण्यात आलं आणि त्यावेळी त्याची आरोपींनी गळा चिरून निर्घृण हत्या केली. घटनेतील आरोपी म्हणजेच मृताच्या पत्नीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून तिच्या प्रियकराला अटक ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3704,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1183,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,517,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,295,Maharashtra,1690,Mumbai,407,Nagpur,47,Nashik,56,Politics,601,Pune,1862,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,41,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: इंस्टाग्रामवर पत्नीचा प्रियकरासोबत फोटो पाहिला अन् वाद टोकाला पोहचला...
इंस्टाग्रामवर पत्नीचा प्रियकरासोबत फोटो पाहिला अन् वाद टोकाला पोहचला...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiCM9ZXTVp3o1yzkTUK1C6yIgq9f7n-DCDABo0wFLIwxGtv-VjScEQiywU3b8jGPB1SNRu0jyQb8xukd1znllZo8FWvWbKsa8M_8pEDyss9bHU5ppKoQxGXIR5Hyjb8cqcxToAOF0w4ATg-6vSARzxc7U7dvrjAisRyqSHHQJF_2aSu0LA-63PUNeWg0ok/s320/1001852235.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiCM9ZXTVp3o1yzkTUK1C6yIgq9f7n-DCDABo0wFLIwxGtv-VjScEQiywU3b8jGPB1SNRu0jyQb8xukd1znllZo8FWvWbKsa8M_8pEDyss9bHU5ppKoQxGXIR5Hyjb8cqcxToAOF0w4ATg-6vSARzxc7U7dvrjAisRyqSHHQJF_2aSu0LA-63PUNeWg0ok/s72-c/1001852235.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/02/blog-post_4.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/02/blog-post_4.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content