एका वसतीगृहात साडेतेरा वर्षांच्या विद्यार्थिनीने लहान बाळाला जन्म दिला. या घटनेनं विद्यार्थिनीच्या सुरक्षेवर आणि निवासी वसतिगृहांच्या व्यव...
एका वसतीगृहात साडेतेरा वर्षांच्या विद्यार्थिनीने लहान बाळाला जन्म दिला. या घटनेनं विद्यार्थिनीच्या सुरक्षेवर आणि निवासी वसतिगृहांच्या व्यवस्थापनेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करत वसतिगृहात अधीक्षकाला निलंबित केलं. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. ही घटना मध्य प्रदेशातील बालाघाट येथील आहे.
8 वी मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थीनी प्रेग्नंट
घडलेल्या घटनेनुसार, परसमऊ कस्तुरबा गांधी हे वसतिगृह जिल्हा शिक्षण केंद्राच्या अंतर्गत चालवले जाते. या वसतिगृहात इयत्ता 8 वी मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थीनी प्रेग्नंट राहिली होती. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणी आदिवासी व्यवहार विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी परसमऊ येथील कस्तुरबा गांधी कन्या वसतिगृहाच्या अधीक्षक श्रीमती चैनाबती सयाम यांना तात्काळपणे निलंबित केले होते.
संबंधित प्रकरणाचा तपास केला असता, अधीक्षकांनी विद्यार्थिनीच्या शारीरिक आरोग्याबाबत आणि वर्तनाबाबत कोणतीही संवेदनशीलता दाखवली नाही. विद्यार्थीनी वसतिगृहात वारंवार अनुपस्थित दर्शवत होती असं वृत्त आहे.
तिचे बाळ दोघेही निरोगी
या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. पीडितेनं जबाबाच्या आधारे गावातील तरुणाला अटक केली. पीडित मुलीचं वय 13.5 असल्याची पुष्टी करण्यात आली होती. दरम्यान, पीडित मुलगी आणि तिचे बाळ दोघेही निरोगी आहेत. त्यांना काळजीसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.


COMMENTS