ओडिशातील बलांगीर जिल्ह्यातील तुरेकेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नववीत शिकणाऱ्या ...
ओडिशातील बलांगीर जिल्ह्यातील तुरेकेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात पीडितेचेच पाच वर्गमित्र आणि एक अन्य व्यक्ती सहभागी असल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. ही अमानवी घटना तेव्हा समोर आली, जेव्हा आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सहा आरोपींनी विद्यार्थिनीला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर पीडितेला धमकावण्यात आले की, तिने कुणालाही काही सांगितल्यास तिला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. भीतीपोटी विद्यार्थिनी काही काळ गप्प राहिली. मात्र आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. पीडितेचे वडील आणि नातेवाईकांनी बलांगीरचे पोलीस अधीक्षक जी. अभिलाष यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार तुरेकेला पोलिसांनी वेगाने तपास करत सर्व सहा आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणी तुरेकेला पोलीस ठाण्यात केस क्रमांक 22/26 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 70 आणि 77, पॉक्सो कायद्याचे कलम 6 तसेच आयटी अॅक्टचे कलम 66 ई अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पीडित विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिचे समुपदेशनही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध स्तरांतून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सोशल मीडियाच्या गैरवापरावर कठोर नियंत्रणाची गरज व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, व्हिडिओ प्रसारित करण्यामागील सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. पीडितेला पूर्ण न्याय मिळावा यासाठी कायदेशीर प्रक्रिया काटेकोरपणे राबवली जाईल, असे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिले आहे.

COMMENTS