मुंबई: दिवसाढवळ्या 19 वर्षीय तरुणीवर गोळ्या झाडून खून... | CrimeNama
Loading ...

मुंबई: दिवसाढवळ्या 19 वर्षीय तरुणीवर गोळ्या झाडून खून...

मुंबईतील गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात मंगळवारी दुपारच्या दुपारास एक भयानक हत्याकांड घडल्याची बातमी समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणीच्या हत्...



मुंबईतील गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात मंगळवारी दुपारच्या दुपारास एक भयानक हत्याकांड घडल्याची बातमी समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका प्रेमी जोडप्याला अटक केल्याचं सांगितलं जात आहे.

प्रेमसंबंधातून तरुणीची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.


मंगळवारी (10 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास फुरकानिया परिसरात गोळीबाराचा आवाज आला. 19 वर्षीय शिफा शिफा शेख नावाच्या तरुणीवर अगदी जवळून गोळी झाडण्यात आली. त्यानंतर, गंभीररित्या जखमी झालेल्या शिफाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यावेळी तिचा वाटेतच मृत्यू झाला. दिवसाढवळ्या भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे मुंबई पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


12 तासांत दोन्ही आरोपींना अटक


शिवाजी नगर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनेचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एक सापळा रचला आणि घटनेतील 25 वर्षीय आणि 23 वर्षीय पुरुष या दोन आरोपींना अटक करण्यात आली. प्रेमसंबंध आणि परस्पर वादातून हत्येचा संपूर्ण कट रचल्याचं प्राथमिक पोलीस तपासात समोर आलं. वृत्तानुसार, प्रकरणातील मृत तरुणी ज्या मुलावर प्रेम करत होती त्या तरुणाचं दुसऱ्या महिलेवर प्रेम होतं आणि यावरून तिघांमध्ये मोठा वाद झाला होता. त्यानंतर, 23 वर्षीय आरोपी तरुणाने तिच्या 25 वर्षीय प्रेयसीसोबत मिळून शिफाच्या हत्येचा कट रचला आणि काल दुपारच्या सुमारास तिची गोळी झाडून निर्घृण हत्या केली. अद्याप, या प्रकरणाबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पोलिसांनी दिली माहिती


पोलिसांच्या माहितीनुसार, मृत शिफा आणि दोन्ही आरोपींमध्ये काही काळापासून मतभेद सुरू होते. डीसीपी समीर शेख यांनी प्रकरणाची माहिती देताना स्पष्ट केलं ही हत्या वैयक्तिक नातेसंबंधातील वाद आणि प्रेमप्रकरणातून झाली. आरोपी महिलेने त्याच्या प्रियकरासोबत मिळून शिफाची हत्या केली. आता, या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या हत्येशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे.

डीसीपी समीर शेख यांच्या मते, आरोपींनी हत्येत वापरण्यात आलेलं शस्त्र कुठून आणलं आणि त्यात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग होता का? हे निश्चित करण्यासाठी दोन्ही आरोपींची कठोर चौकशी सुरू आहे. संबंधित प्रकरणाचा अद्याप सुरूवातीच्या टप्प्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4114,Buldhana,16,Chandrapur,2,Cooking,2,Crime,1517,Dhule,14,Entertainment,57,Gadchiroli,5,Health,452,India,760,Jalgaon,32,Jalna,18,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1772,Mumbai,431,Nagpur,51,Nashik,69,Politics,617,Pune,1920,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: मुंबई: दिवसाढवळ्या 19 वर्षीय तरुणीवर गोळ्या झाडून खून...
मुंबई: दिवसाढवळ्या 19 वर्षीय तरुणीवर गोळ्या झाडून खून...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhV8tD6SUJFuWddmCI5y24agHpi_2GnHAnEjtj-QiE3N-8Hw4yeDzIgMmgcjr1YL-cmGjbEeKQzF9h4JX49WT5jVORuF-HBDhNnG8NF8PU0Yv6k9R6zqwY9Fn4MMkbStQ94hvFiPXj7anXBeo_mRn8Pcyokj-s3HijFNzKuiULLvdUvASNXCYCnt4xrCWo/s320/1001876145.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhV8tD6SUJFuWddmCI5y24agHpi_2GnHAnEjtj-QiE3N-8Hw4yeDzIgMmgcjr1YL-cmGjbEeKQzF9h4JX49WT5jVORuF-HBDhNnG8NF8PU0Yv6k9R6zqwY9Fn4MMkbStQ94hvFiPXj7anXBeo_mRn8Pcyokj-s3HijFNzKuiULLvdUvASNXCYCnt4xrCWo/s72-c/1001876145.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/02/19.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/02/19.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content