माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार झारखंडच्या पलामू जिल्ह्यातून उघडकीस आला आहे. आईने आपल्या 13 वर्षीय मुलीचे 55 वर्षीय पुरुषाशी विव...
माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार झारखंडच्या पलामू जिल्ह्यातून उघडकीस आला आहे. आईने आपल्या 13 वर्षीय मुलीचे 55 वर्षीय पुरुषाशी विवाह लावून स्वाधीन करण्यात आले.
आरोपीने केवळ निष्पाप मुलीशी लग्न केलं नाही, तर तिला दोन महिने ओलीस ठेवले. पोलिसांनी या प्रकरणात जलद कारवाई करत अल्पवयीन मुलीची सुटका केली, संबंधित प्रकरणात आरोपीला तुरुंगात टाकण्यात आले आहे.
'आईचे एका परपुरुषाशी प्रेमसंबंध होते'
संपूर्ण घटना पलामूच्या नवजयपूर पोलीस ठाणे परिसरात घडल्याचे वृत्त आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आईचे एका परपुरुषाशी प्रेमसंबंध होते. तिच्या मार्गातील अडथळे दूर व्हावे यासाठी तिने तिच्या निष्पाप मुलीला विकले. अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितलं की, आईने खोटे बोलून वडिलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. वडिलांच्या मृत्यूची खोटी भीती दाखवून आईने मुलीला दोन महिन्यांपूर्वी प्रभाकर कुमार मिश्रा (वय 55) नामक व्यक्तीकडे पाठविले होते.
पीडितेनं रडत आईने क्रूरतेच्या कटाची कहाणी सांगितली..
संबंधित मुलगी कुठेही न आढळल्याने त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. नंतर शोध घेत पुन्हा ते घरी परतले. घरी आल्यानंतर त्या पीडितेनं रडत आईने केलेल्या क्रूरतेच्या कटाची माहिती दिली होती. संबंधित प्रकरण उघडकीस आल्यानंतर पलामू पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार, सदर पोलीस ठाण्याने परिसरात छापा टाकत आरोपी प्रभाकर मिश्राच्या मुसक्या आवळल्या.
संबंधित प्रकरणात प्रभाकर मिश्रावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पीडितेची सुटका करण्यात आली असून तिचे समुपदेशन सुरु आहे. दरम्यान, पीडितेची आई आपल्या प्रियकरासोबत पळून गेली.


COMMENTS