प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर जिल्हा पुणे अंतर्गत दिनांक 1...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर जिल्हा पुणे अंतर्गत दिनांक 13/1/2026 रोजी कै.इंदिराबाई जोगळेकर वादविवाद व गटचर्चा स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ व उत्कृष्ट वक्ता निवड नुकतीच पार पडली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त श्री अनिलकाका जोगळेकर होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे व अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.आर.डी.चौधरी,समन्वयक व उपप्राचार्या प्रा.पी.एस.लोढा,पर्यवेक्षक प्रा.एस.ए.श्रीमंते,कार्यालयीन प्रबंधक सौ.एम.डी.कोरे,एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा.के.जी.नेटके,वरिष्ठ वक्तृत्व मंडळाचे चेअरमन प्रा.डॉ.वंदना नढे व ज्युनिअर वक्तृत्व मंडळाचे चेअरमन प्रा.एस.डी.सोनार तसेच वक्तृत्व मंडळातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे विश्वस्त श्री अनिलकाका जोगळेकर यांनी या स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी स्वप्न पहावी व ती स्वप्न साकार व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा.मी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण व्हावी असे स्वप्न पाहिले होते व ही स्पर्धा गेली 49 वर्ष अत्यंत जोमाने अखंडपणे यशस्वीरित्या चालू आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी 50 व्या वर्षात पदार्पण करेल. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. बी.वाघमारे यांनी या स्पर्धेतून जी वक्तृत्वाची संधी मिळते त्या संधीचं सोनं करावे.वक्तृत्वासाठी ही स्पर्धा अत्यंत उत्कृष्ट व्यासपीठ आहे यातून अनेक वक्ते तयार झाले आहेत आणि ते उच्च स्तरावर कार्यरत आहेत ही महाविद्यालयाची अभिमानास्पद बाब आहे अशी भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.डी.सोनार यांनी केले,तर पाहुण्यांचा परिचय प्रा.आर.व्ही.गायकवाड यांनी केले.
दिनांक 27 /12 /2015 रोजी कै.इंदिराबाई जोगळेकर वादविवाद व गटचर्चा स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडला. ज्युनिअर विभाग स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक खालील गटांनी पटकावले प्रथम क्रमांक अकरावी विज्ञान स्वामी विवेकानंद ग्रुप,द्वितीय क्रमांक अकरावी विज्ञान मॉर्डन युथ ग्रुप, तृतीय क्रमांक अकरावी कॉमर्स आम्ही श्री शिव छत्रपती महाविद्यालयाचे चॅम्पियन,तसेच वरिष्ठ विभागातील पुढील विद्यार्थ्यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले.प्रथम क्रमांक-अल्फिया नजीर पठाण आणि नम्रता रवींद्र सोनवणे, द्वितीय क्रमांक- संतोषी संतोष कामटकर आणि आदित्य दिलीप कुमकर,तृतीय क्रमांक -मयुरी दिपक खरात आणि निकिता प्रवीण डोके.उत्कृष्ट वक्ता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या स्पर्धेसाठी ज्युनिअर विभाग स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.जी.एम. रोकडे व प्रा.आर.ए. मोरे,प्रा.एस.जी.भोर यांनी काम पाहिले तसेच वरिष्ठ विभागाच्या स्पर्धेचे परीक्षक प्रा.वाय.सी.गिरमे,प्रा.पी.एस.
उतळे,प्रा.आर.बी.जोशी यांनी काम पाहिले.


COMMENTS