शेतात निघालेल्या विवाहितेला दिवसाढवळ्या उचललं, बळजबरीने थारमध्ये बसवलं अन... | CrimeNama
Loading ...

शेतात निघालेल्या विवाहितेला दिवसाढवळ्या उचललं, बळजबरीने थारमध्ये बसवलं अन...

  शेतात कामासाठी निघालेल्या महिलेचं दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही राजस्थानच्या अलवर येथे घ...

 


शेतात कामासाठी निघालेल्या महिलेचं दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही राजस्थानच्या अलवर येथे घडली. दरम्यान, थार कारमधून आलेल्या आरोपींनी अचानक महिलेला बळजबरीने गाडीत बसवलं आणि तिचं अपहरण केलं.

पीडितेचं सहा महिन्यांपूर्वीच लव्ह मॅरेज झालं असून ती तिच्या पतीसोबत राहत होती. सध्या, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.


हे प्रकरण अलवर जिल्ह्याच्या गोविंदगड पोलीस स्टेशन हद्दीतील चिमरवाडा गावातील असल्याचं वृत्त आहे. संबंधित महिला शेतात कामासाठी जात असताना वाटेत एक कार वेगाने येताना दिली. ती गाडी दिसताच महिला रस्त्याच्या कडेला झाली. त्यावेळी अचानक शेतात लपून बसलेला तरुण अचानक मागून आला आणि त्याने पीडितेला पकडून बळजबरीने गाडीत बसवलं. त्यानंतर, आरोपी गाडीतून फरार झाले.

गावकरी घटनास्थळी धावले अन्...


दरम्यान, आरोपींच्या तावडीतून सुटण्यासाठी महिलेने खूप प्रयत्न केले. त्यावेळी, पीडितेचा आरडाओरडा ऐकून आसपासच्या शेतात काम करणारे गावकरी घटनास्थळी धावले, मात्र तोपर्यंत आरोपी महिलेला घेऊन गाडीतून फरार झाले. महिलेचं अपहरण झाल्याचं समजताच गावातील लोक मोठ्या संख्येत घटनास्थळी दाखल झाले आणि पीडितेच्या कुटुंबियांना सुद्धा याची माहिती देण्यात आली.

घटनेनंतर, महिलेच्या पतीने गोविंदगड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तसेच पोलीस कंट्रोल रूमला या प्रकरणाची माहिती देण्यात आली. संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलीस कारवाई सुरू केला आणि संभाव्य मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली. यासोबतच, आसपासच्या परिसरात पीडितेचा शोध घेण्यास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेत वापरण्यात आलेल्या थार कारची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी, आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. सध्या, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3704,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1183,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,517,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,295,Maharashtra,1690,Mumbai,407,Nagpur,47,Nashik,56,Politics,601,Pune,1862,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,41,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: शेतात निघालेल्या विवाहितेला दिवसाढवळ्या उचललं, बळजबरीने थारमध्ये बसवलं अन...
शेतात निघालेल्या विवाहितेला दिवसाढवळ्या उचललं, बळजबरीने थारमध्ये बसवलं अन...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhOp0PhC8Wshlh0kGTvSAkh7kZMbZGT5PsktS0nf3__GREkeRChyAdjFFDeEEYjenBfR1ZVAMgq6vTAwpbnkCZ59ZKiW111T5N-Btf5WWXPW6X2erkidHi_SxvonK63xKOpiuDvM6OteLpqFfCJ0YDErA2mUFsxA7ZklYr4qAixYPkj1hStBjNClv3DvQo/s320/1001789604.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhOp0PhC8Wshlh0kGTvSAkh7kZMbZGT5PsktS0nf3__GREkeRChyAdjFFDeEEYjenBfR1ZVAMgq6vTAwpbnkCZ59ZKiW111T5N-Btf5WWXPW6X2erkidHi_SxvonK63xKOpiuDvM6OteLpqFfCJ0YDErA2mUFsxA7ZklYr4qAixYPkj1hStBjNClv3DvQo/s72-c/1001789604.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/01/blog-post_96.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/01/blog-post_96.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content