सोलापूर: विवाहित महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून खून करून आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला आहे. या घटनेमुळे करोळे (ता. पंढरपूर) परिसरा...
सोलापूर: विवाहित महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून खून करून आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला आहे. या घटनेमुळे करोळे (ता. पंढरपूर) परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मायाक्का ऊर्फ माया विष्णु शिंगाडे (वय २३) असे मृत महिलेचे नाव आहे. १९/०१/२०२६ पहाटे ०५.३० वाजता विष्णु हरिदास शिंगाडे (वय ३० वर्ष, रा. करोळे, ता. पंढरपूर) व त्याची आई मंगलाबाई शिंगाडे हे दोघे विष्णू याची पत्नी मायाक्का ऊर्फ माया विष्णु शिंगाडे हिने घराजवळील झाडाला गळफास घेतलेल्या आवस्थेत मिळून आल्याचे सांगून तिला उपजिल्हा रुग्णालय अकलूज (ता. माळशिरस) येथे उपचार कामी घेऊन गेले होते. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून ती उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन महिलेच्या मृतदेहाची पाहणी केल्यावर तिच्या गळयावर गळफास घेतल्याचे वण दिसत होते. परंतु, तिचे चेहरऱ्यावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्याने पती विष्णू शिंगाडे व सासू मंगलबाई शिंगाडे यांचेकडे केलेल्या तपासात त्या दोघांच्या बोलण्यात तफावत जाणवली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याने त्या दोघांकडे सखोल तपास करत तसेच सदर मयत महिलेचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून पोस्टमार्टम केले असता तिचा मृत्यू हा गळा दाबून झाल्याचे माहिती प्राप्त झाली. महिलेचा गळा दाबून खून करून गळफास घेतल्याचा बनाव पती, सासू, सासरे यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सासरकडील लोकांकडून तिच्या बाळंतपनाचा खर्च हा माहेरील लोकांनी दिला नाही म्हणून तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक मानसिक छळ सुरू होता. मयत महिलेला तिचे माहेरी जाऊन देत नव्हते तसेच माहेरातील व्यक्तीशी बोलूनही दिले जात नव्हते, अशी फिर्याद मयत महिलेचा भाऊ बिरूदेव ज्ञानदेव सलगर (रा. करोळे, ता. पंढरपुर) यांनी दिल्यानंतर फिर्यादीवरून करकंब पोलिस गु.२.नं. १४/२०२६ भा. न्या. सं. कलम १०३ (१), ८०, ८५, २३८, ३५१(२), ३५२, ३(५) प्रमाणे मयत महिलचा नवरा विष्णु हरीदास शिंगाडे, सासरा हरीदास शिंगाडे, सासु मंगलाबाई हरीदास शिंगाडे (सर्व रा करोळे ता पंढरपुर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व तात्काळ अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई/निलेश गायकवाड हे करीत आहेत.
सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रितम यावलकर, अपर पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, प्रशांत डगळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक पंढरपूर उप विभाग पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली करकंब पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी सपोनि योगेश लंगुटे, पोसई निलेश गायकवाड सोर, पोहेकों अरूण राजकर, पोहेको लक्ष्मण भांगे, पोहेको असिफ आतार, पोहेको तानाजी धिमधिमे, पोहेको संदेश शिकतोडे, पोना हनमंत सावंत, पोकों शाम गायकवाड, पोकॉ स्वप्निल बागल, पोकॉ अमोल माळी, पोकॉ धनाजी सुर्वे, पोकों / काळे, सर्व नेमणुक करकंब पोलिस ठाणे यांनी पार पाडली.


COMMENTS