प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती या दिनाचे औचित्य साधून दि १२ ते १९ जानेवारी ...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती या दिनाचे औचित्य साधून दि १२ ते १९ जानेवारी २०२६ दरम्यान राष्ट्रीय युवक सप्ताह मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाघमारे यांनी दिली. या सप्ताहची सुरुवात १२ जानेवारी रोजी स्वछता अभियान या उपक्रमाने करण्यात आली. या उपक्रमांतर्गत सर्व स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरातील साफसफाई करण्यात आली. दि.१३ जानेवारी रोजी महाविद्यालयामध्ये योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात प्रा.विक्रम रसाळ यांनी योग साधना व ध्यान धारणा विषयीचे महत्व स्वयंसेवकांना पटवून दिले.दि. १४ जानेवारी रोजी महाविद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे पद यात्रेचे आयोजन करण्यात आले.या रॅलीसाठी मोठया संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची रांगोळी स्पर्धा दि.१५ जानेवारी रोजी घेऊन विद्यार्थ्यांमध्ये कला कौशल्य विकास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जनजागृती पर राष्ट्रीय युवक सप्ताहाची सांगता १९ जानेवारी रोजी प्रा.शरद मनसुख यांचे "स्वामी विवेकानंद व त्यांचे विचार"या विषयावर व्याख्यान संपन झाले.स्वामी विवेकानंद यांची जीवनगाथा उदाहरण दाखले व अनुभव या मधून प्रा.मनसुख यांनी तरुण पिढीला प्रबोधन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुप्रिया काळे व आभार प्रदर्शन प्रा विष्णू घोडे यांनी केले.अशा वैविध्यपूर्ण सामाजिक,वैचारिक,शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन या राष्ट्रीय सेवा योजना विभागातंर्गत राष्ट्रीय युवक सप्ताह मध्ये झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागास व स्वयंसेवकांचे विशेष कौतुक केले.संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी यांनी सप्ताहात कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांना प्रोत्साहन दिले.
राष्ट्रीय युवक सप्ताहात मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना निमित्ताने युवक सप्ताहाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.महेंद्र कोरडे,डॉ सुप्रिया काळे, प्रा मयूर चव्हाण, प्रा.जयश्री कणसे,प्रा.विष्णू घोडे यांनी केले.


COMMENTS