पुणे : वारजे परिसरात एका जन्मदात्या आईने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...
पुणे : वारजे परिसरात एका जन्मदात्या आईने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलीच्या आजारपणामुळे आलेल्या नैराश्यातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
हाडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीच्या आईने दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना वारजे भागात घडली. मुलीचा खून केल्यानंतर आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. शारवी आदिनाथ देवडकर (वय २ वर्ष ३ महिने), तिची आई छाया (वय २८) अशी मृत्यू झालेल्या माय-लेकीची नावे आहेत. याबाबत महिलेच्या पतीने आदिनाथ संताराम देवडकर (वय ३०, रा. कारगिल फार्म हाऊसजवळ, गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पत्नी छाया देवडकर हिच्याविरोधात मुलीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, आदिनाथ देवडकर हे पत्नी छाया आणि मुलगी शारवी हे गोकुळनगर पठार परिसरात वास्तव्यास आहेत. शारवी हाडांच्या आजाराने ग्रस्त होती. तिच्यावर उपचार देखील सुरू होते. मुलीला झालेल्या आजारामुळे छाया नैराश्यात गेली होती. शुक्रवारी (ता. २) पती आदिनाथ कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ते कामावरून घरी आले. तेव्हा शारवी घरातील पाळण्यात निपचित पडली होती. तिचे हात-पाय चिकटपट्टीने बांधण्यात आलेले होते. पत्नी छायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहिल्यानंतर घाबरलेल्या आदिनाथ यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच एसीपी शीतल जानवे, पोलिस निरीक्षक धेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोघींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शारवीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे तपासणीत उघडकीस आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS