"माझ्या वडिलांची प्रकृती गंभीर..." इमर्जन्सी कॉलच्या बहाण्याने डॉक्टरांना बोलवलं अन्... | CrimeNama
Loading ...

"माझ्या वडिलांची प्रकृती गंभीर..." इमर्जन्सी कॉलच्या बहाण्याने डॉक्टरांना बोलवलं अन्...

पुण्यातील सहकार नगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बनावट इमर्जन्सी कॉलच्या माध्यमातून उपचारांसाठी डॉक्टरांना बोलवून त्यांना ...



पुण्यातील सहकार नगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बनावट इमर्जन्सी कॉलच्या माध्यमातून उपचारांसाठी डॉक्टरांना बोलवून त्यांना लुटण्यात आल्याचं वृत्त आहे.

दोन अज्ञात व्यक्तींनी स्वत: गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं खोटं सांगून पीडित पीडित डॉक्टरांना उपचारांसाठी घटनास्थळी बोलवलं आणि नंतर चाकूचा धाक दाखवून त्यांच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, डॉक्टर गंभीररित्या जखमी झाले असून घटनेच्या वेळी आरोपी त्यांच्याकडून पैसे आणि त्याच्या मौल्यवान वस्तू घेऊन फरार झाले.


आरोपींनी योजना आखली अन्...


प्रकरणातील 49 वर्षीय पीडित डॉक्टरचं नाव डॉ. छाजेड असून ते बालाजी नगर परिसरात राहतात. संबंधित डॉक्टर एक स्थानिक क्लिनिक चालवत असून आवश्यकता असल्यास रुग्णांच्या घरी जाऊन इमरजंसी मेडिकल सेवा देखील पुरवतात. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डॉक्टरांची माहिती मिळवली आणि त्यानंतर, संबंधित घटनेची योजना आखली.


वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगून डॉक्टरांना घरी बोलवलं अन्...


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री जवळपास 9 वाजताच्या सुमारास आरोपींनी डॉक्टरांना फोन केला आणि आपल्या वडिलांची प्रकृती गंभीर असून त्यांना तात्काळ उपचारांची गरज असल्याचं खोटं सांगितलं. फोन करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवून डॉ. छाजेड पुणे-सातारा हायवेवरील शंकर महाराज मठाजवळ असलेल्या पत्त्यावर पोहोचले. मात्र, त्यावेळी दोन्ही आरोपींनी पीडित डॉक्टरांवर हल्ला केला.

चाकूचा धाक दाखवून धमकी अन् मारहाण


आरोपींनी डॉक्टरांना चाकूचा धाक दाखवून त्यांना धमकावलं आणि मारहाण सुद्धा केल्याचा आरोप आहे. दरम्यान, स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात डॉक्टरांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर, डॉक्टरांची दुचाकी, त्यांच्या बॅगेत ठेवलेले 30,000 रुपये, मोबाईल फोन आणि चांदीचा ग्लास घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

संबंधित घटनेची माहिती मिळताच, सहकार नगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी विठ्ठल पवार यांच्या माहितीनुसार, घटनेची एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून आरोपींचं हे कृत्य पूर्व नियोजित असल्याचं स्पष्ट होत आहे. पीडित डॉक्टरांना बनावट इमरजंसी कॉलच्या माध्यमातून जाळ्यात अडकवण्यात आलं. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा पोलीस तपास करत असून फरार आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न केले जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,81,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3752,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1225,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,545,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,296,Maharashtra,1701,Mumbai,410,Nagpur,49,Nashik,57,Politics,603,Pune,1870,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,42,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: "माझ्या वडिलांची प्रकृती गंभीर..." इमर्जन्सी कॉलच्या बहाण्याने डॉक्टरांना बोलवलं अन्...
"माझ्या वडिलांची प्रकृती गंभीर..." इमर्जन्सी कॉलच्या बहाण्याने डॉक्टरांना बोलवलं अन्...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgc8gadjMOdByxKEmgRN3uT7pmvSJsqhBs_PBPEYglvVCzG0CPYNChqOBHBhBE5AKhc3ZydPeS0woodAkVvIRkuM71lYSafH30TtVvvHYkjkxYAaDMQhUFxP-kdV5t0jtssxW0HXFGocRj8Cd726mb0bqnMviCpNtOY5ww2bNMo1jESA16bJ7TVWdDUW90/s320/1001724949.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgc8gadjMOdByxKEmgRN3uT7pmvSJsqhBs_PBPEYglvVCzG0CPYNChqOBHBhBE5AKhc3ZydPeS0woodAkVvIRkuM71lYSafH30TtVvvHYkjkxYAaDMQhUFxP-kdV5t0jtssxW0HXFGocRj8Cd726mb0bqnMviCpNtOY5ww2bNMo1jESA16bJ7TVWdDUW90/s72-c/1001724949.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/01/blog-post_74.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/01/blog-post_74.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content