प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोवेशन सेंटर व जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांच्यामध्ये नुकताच सामं...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोवेशन सेंटर व जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती स्टार-इनोटेक सर्व्हिसेस प्रा. लि. संचालक युवा शास्त्रज्ञ डॉ. प्रतिक मुणगेकर व जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे यांनी दिली.
याप्रसंगी स्टार-इनोटेक सर्व्हिसेस प्रा. लि. संचालक युवा शास्त्रज्ञ डॉ. प्रतिक मुणगेकर, डॉ. रतिलाल बाबेल, डॉ. कल्पेश जाधव, डॉ. तानाजी वामन तसेच जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाचे सचिव प्रकाश जोंधळे, उपाध्यक्ष प्रशांत शेटे, जिल्हा प्रतिनिधी संजय कुटे, सहसचिव सोमनाथ सोनवणे, तालुका प्रतिनिधी प्रमोद जाधव, योगेश शेळके, सदस्य ज्ञानेश्वर सस्ते, अविनाश शेटे आदी उपस्थितीत होते.
दोन्ही संस्थांच्या झालेल्या संयुक्त सभेत हा सामंजस्य करार करण्यात आला यामध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पेटंट बाबत माहिती देणे, रिसर्च पेपर रायटिंग, विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाची माहिती देऊन विज्ञान दिन साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. वर्षभर दोन्ही संस्थांच्या वतीने तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध वैज्ञानिक उपक्रम आयोजित आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व मूलभूत संकल्पना दृढ करण्याच्या दृष्टीने उपक्रमांची आखणी केलेली आहे असे संचालक डॉ. रतिलाल बाबेल यांनी या प्रसंगी सांगितले.


COMMENTS