प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर दिनांक २०/ ०१/ २०२६ रोजी श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
दिनांक २०/ ०१/ २०२६ रोजी श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने आयोजित रस्ता सुरक्षा महिना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोटार वाहन निरीक्षक श्री जयंत मोरे व सौ गीतांजली काळे,पत्रकार श्री नितीन कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर.डी.चौधरी,कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक व उपप्राचार्य प्रा.पी.एस.लोढा, पर्यवेक्षक प्रा एस.ए. श्रीमंते,कला विभाग प्रमुख प्रा.आर.एस.कांबळे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री जयंत मोरे यांनी मार्गदर्शन करताना शिक्षक व विद्यार्थ्यांनी रस्त्याने जाता येता व वाहन चालवताना आपली काळजी घ्यावी.वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून रस्ते अपघात कमी होण्यासाठी मदत करावी.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे व अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी. कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.आर.डी चौधरी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.अपघातग्रस्त लोकांना सहकार्याची भावना ठेवून त्यांना मदत करावी असे सांगितले केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निलेश आमले तर आभार प्रा पुनम मनसुख यांनी मानले.



COMMENTS