प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर जुन्नर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे राष्ट्रीय सेवा योजना आणि श्री शिव छत्रपती महाविद्यालय यांच्या ...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे राष्ट्रीय सेवा योजना आणि श्री शिव छत्रपती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि 28 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत 'युवक युवती उन्नयनीकरण कार्यक्रम अंतर्गत तीन दिवशीय विद्यापीठ स्तरीय लोककला (लोकसंगीत,लोकनृत्य) कार्यशाळा मु.पो.घाटघर,ता. जुन्नर,पुणे याठिकाणी संपन्न झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाघमारे यांनी दिली. या कार्यशाळेचे उद्घाटन दि. 28 जानेवारी रोजी श्री.तुकाराम धांडे रानकवी यांच्या हस्ते व तद्नंतर त्यांच्या रान कविता सादरीकरणातून निसर्ग प्रेरणा व जगलेले जीवन आणि लोकसंस्कृती यांचा पगडा त्यांच्या कवितांवर कसा झाला याचा उहापोह त्यांनी स्वयंसेवकासोबत केला. नाणेघाट शिलालेख हा महाराष्ट्राचा इतिहास व लोकसंस्कृतीचा वारसा सांगत असल्याचे दुर्गवाचक श्री सिद्धार्थ कसबे यांनी प्रत्यक्ष शिलालेख वाचन करून स्वयंसेवकास त्याचे महत्व पटवून दिले. दि.29 जानेवारी रोजी विध्यार्थ्यांना जीवधन किल्ला व किल्ल्याचा इतिहास याची ओळख करून देण्यात आली तसेच दुपारच्या सत्रात श्री.स्वामीराज भिसे यांनी विध्यार्थ्यांना पथनाट्य निर्मितीचे धडे दिले. दि. 30 जानेवारी रोजी सकाळ सत्रात आदिवासी पाड्यांना भेटी देत आदिवासी लोककलेचा अभ्यास स्वयंसेवकांनी केला.दुपार सत्रात नृत्य विशारद श्री. विकास घोगरे व श्री.अनंता द्रविड यांनी स्वयंसेवकांना महाराष्ट्रातील विविध लोककला,नृत्य प्रकार यांचे प्रात्यक्षिकाद्वारे ओळख व प्रशिक्षण दिले.कार्यक्रम समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघामारे यांनी लोककला या ताण तणाव व कामाचा शीण कमी करण्याचे साधन असून पूर्वापार ग्रामीण लोक ती लोककला जोपासत असल्याचे सांगितले. वारसा जोपासण्याचे आव्हान तरुणांनी पेलावे असे प्रतिपादन केले. सहभागी सा.फु.पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील सहभागी स्वयंसेवकांना शुभेच्छा देवून सहभाग प्रमाणपत्रांचे वाटप केले. दि.३१ जानेवारी रोजी सर्व स्वयंसेवकांनी कार्यशाळा सहभागानंतर आनंदात आपापल्या घरी प्रस्थान केले.लोककला (लोकसंगीत,लोकनृत्य) कार्यशाळेच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागास व स्वयंसेवकांचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या.अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी यांनी कार्यशाळा कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले केले.
लोककला (लोकसंगीत, लोकनृत्य) कार्यशाळेत पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालायामधून मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित असल्याचे कार्यक्रम अधिकारी डॉ.महेंद्र कोरडे यांनी सांगितले. लोककला (लोकसंगीत, लोकनृत्य) कार्यशाळेचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.महेंद्र कोरडे,डॉ सुप्रिया काळे, प्रा मयूर चव्हाण, प्रा जयश्री कणसे,प्रा विष्णू घोडे यांनी केले.


COMMENTS