प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक सन- २०२६ यांची अधिसुचना दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सर्वत...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक सन- २०२६ यांची अधिसुचना दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सर्वत्र राज्यभर निवडणुकीचे रणधुमाळी सुरू असताना, राज्य शासनाच्या वतीने सर्व मतदार बंधू- भगिनी यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, येत्या पाच फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते ५:३० वाजता आपले बहुमोल मत देऊन मतदान करावे आपले मतदान ठेवू नये असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनिल शेळके व स्विप टिम तथा मनुष्यबळ गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे आणि नोडल अधिकारी विष्णू ढोंडगे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
यावेळी मनुष्यबळ तथा स्विप टीमचे तुकाराम वडेकर यांनी उच्छिल शाळेत येऊन परिसरातील उस कामगार व गावातील मतदारांशी संपर्क साधून चर्चा केली यावेळी उपस्थित शाळेचे पदवीधर शिक्षक सुभाष मोहरे उपशिक्षिका आरती मोहरे व स्मिता ढोबळे हे होते यावेळी सांगितले की,नागरिकांनी लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने आपला मतदानाचा हक्क बजवावा व आपली लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही केले यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी यांची प्रभातफेरी काढून, गावातील मतदार बंधू भगिनी यांना मतदान करण्याचे आवाहन व माहिती देण्यात आली.


COMMENTS