प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते, विनोद...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते, विनोदी व्यक्तिमत्व, उत्कृष्ट कवी संदीप पाठक यांच्या हस्ते वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. संदीप पाठक यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये आपलं ध्येय निश्चित करून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करावे असा मोलाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहून त्याचा योग्य वापर करावा. विद्यार्थ्यांची वाचन संस्कृती वाढवावी, तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ द्यावा. नाट्य साहित्यामध्ये मराठी रंगभूमीचं सुवर्णपान म्हणून जगातील एकमेव प्रतिकृती असणारे लक्ष्मण देशपांडे यांच “वऱ्हाड निघाल लंडनला” या एकपात्री नाटकाचे देशभरात एकूण २८०० प्रयोग झाले. त्यातील संदीप पाठक यांनी एक पात्री नाटकाचे ६०० प्रयोग करुन त्यामध्ये दोन तासात ५२ पात्र साकारणारे अभिनेते म्हणून परिचित आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजय शिवाजीराव काळे यांनी आपल्या मनोगतातून शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष नैपुण्य प्राप्त केलेले प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांचे कौतुक केले. श्री शिव छत्रपती महाविद्यालयाने अनेक विद्यार्थी कलावंत, दिग्दर्शक, अधिकारी, डॉक्टर, सैन्य व पोलीस दल अशा विविध क्षेत्रांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपलं नाव उज्वल केल्याचा सार्थ अभिमान आहे. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हा प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्या पाठीवर शब्बासकी देण्यासाठी असल्याचे ॲड. संजय शिवाजीराव काळे यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी आदर्श गुणवंत प्राध्यापक व प्राध्यापिका पुरस्कार प्रा. अभिजीत डुंबरे, प्रा. सारिका सोनार व आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार सौ. मनीषा कोरे तसेच आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनी पुरस्कार अनुक्रमे कु. रवी सोमा कोकणे, कु. संतोषी संतोष कामटकर यांना प्रदान करण्यात आला. विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. निवृत्तीशेठ काळे, संस्थेचे सचिव श्री. दत्तात्रय थोरात, संस्थेचे सहसचिव श्री. सुभाष कवडे, संस्थेच्या खजिनदार सौ. कांताताई मस्करे, विश्वस्त श्री. अनिलकाका जोगळेकर, ॲड. अविनाश थोरवे, श्री. अशोकराव काळे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे, उपप्राचार्य डॉ. आर. डी. चौधरी, समन्वयक व उपप्राचार्या प्रा. पी. एस. लोढा, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. डी. बी. सोनार, पर्यवेक्षक प्रा. एस. ए. श्रीमंते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा देसाई तर आभार डॉ. आर. डी. चौधरी यांनी केले.


COMMENTS