प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथील अर्थशास्त्र विभाग प्...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा सचिन कसबे यांना नुकतीच अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी बलभीम महाविद्यालय बीड येथील प्रोफेसर डॉ.सोमेश्वर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली ''नांदेड जिल्ह्यातील सहकारी व सार्वजनिक बँकांनी केलेल्या कृषी पतपुरवठ्याचा अभ्यास"" सन 2002 ते 2012 या विषयावर शोध प्रबंध डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर विद्यापीठात सादर केला होता. दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अर्थशास्त्र विभाग येथील त्यांचे गुरुवर्य प्रोफेसर डॉ.सुनील नरवडे यांच्या अध्यक्षतेखाली व कला व विज्ञान महिला महाविद्यालय मेहकर जिल्हा बुलढाणा येथील बहिस्थ परीक्षक प्रोफेसर डॉ.संतोष कुटे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या खुल्या ऑनलाइन मौखिक परीक्षेमध्ये त्यांना अर्थशास्त्र विषयातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे तसेच संस्थेचे पदाधिकारी,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी,प्राचार्य डॉ महादेव वाघमारे व उपप्राचार्य डॉ रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी विद्यापीठातील त्यांचे गुरुवर्य,विविध विद्यापीठातील ग्रंथालय,सहकारी प्राध्यापक वृंद,कुटुंबीय,प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणारे मित्र परिवार यांना दिले आहे.तरी त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.


COMMENTS