व्हिडीओ कॉल, धमकी अन् अश्लील व्हिडीओ... 82 वर्षीय वृद्धासोबत घडलं भयानक! | CrimeNama
Loading ...

व्हिडीओ कॉल, धमकी अन् अश्लील व्हिडीओ... 82 वर्षीय वृद्धासोबत घडलं भयानक!

  गुजरातच्या अहमदाबाद येथून सायबर क्राइमचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे एका 82 वर्षीय वृद्ध व्यक्तीला सायबर भामट्यांनी घाबरवून आ...

 


गुजरातच्या अहमदाबाद येथून सायबर क्राइमचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे एका 82 वर्षीय वृद्ध व्यक्तीला सायबर भामट्यांनी घाबरवून आणि धमक्या देऊन त्याच्याकडून तब्बल 7.12 कोटी रुपये उकळल्याचं वृत्त आहे.

या प्रकरणात अहमदाबादच्या सायबर क्राइम ब्रांचने 12 आरोपींना अटक केली असून त्यांचं इंटरनॅशनल सायबर गँगशी संबंध असल्याची माहिती आहे. कंबोडियातील चिनी गुन्हेगारांनी या सायबर नेटवर्कचं नेतृत्व केलं होतं.


सेलिब्रिटींना अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा दावा


4 डिसेंबरपासून या सायबर फसवणूकीला सुरूवात झाली. त्यावेळी, पीडित वृद्धाला एका अज्ञात नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ट्राय (TRI) अधिकारी असल्याची ओळख करून दिली आणि पीडित वृद्धाच्या आधार कार्डचा वापर करून सेलिब्रिटींना अश्लील व्हिडिओ पाठवण्यात आला असून त्याच्याविरुद्ध मुंबई गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्यात आल्याचा आरोपीने दावा केला. त्यानंतर, फसवणूक करणाऱ्यांनी मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून पीडित व्यक्तीला व्हिडिओ कॉल केले.


तसेच, संबंधित वद्धाला घाबरवण्यासाठी आरोपींनी 2 कोटी रुपयांच्या ट्रान्झेक्शनचे बनावट पुरावे दाखवले आणि पीडित व्यक्तीचं नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात नरेश गोयलशी जोडलं गेल्याचं सांगितलं. त्यानंतर, व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्याला एक बनावट न्यायालय दाखवण्यात आलं. तसेच, त्या वृद्ध माणसाला 24 तास कॉलवर राहण्यास आणि डिजिटल अरेस्ट करण्याबाबत सांगण्यात आलं.

तुरुंगवास आणि मारहाणीची धमकी


यासोबतच, आरोपींनी पीडित व्यक्तीला बनावट लेटर आणि वॉरंट पाठवून सीबीआय, आरबीआय, ईडी आणि इंटरपोलच्या LOGO चा वापर केला आणि तुरुंगवास तसेच मारहाणीची धमकी दिली. त्यानंतर, 16 ते 26 डिसेंबर दरम्यान त्यांनी पीडित वृद्धाकडून त्याच्या बँक खात्याची आणि संपत्तीची माहिती मिळवली. तसेच, व्हेरिफिकेशन नंतर पीडित तरुणाला त्याचे पैसे परत पाठवले जातील, असं आरोपींनी आश्वासन दिलं. याच खोट्या आश्वसनाच्या आधारे आरटीजीएस आणि चेकच्या माध्यमातून वृद्धाने 7.12 कोटी सायबर भामट्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले.

आरोपींकडून 16 मोबाईल फोन आणि रक्कम जप्त


त्यानंतर, सायबर तपासात समोर आलं की या नेटवर्कचं काम कंबोडिया येथून चालवलं जातं. अहमदाबाद आणि सूरतमध्ये येथील रहिवासी असलेल्या 12 अटक केलेल्या आरोपींनी आपल्या बँक खात्यांचा वापर कमीशन घेण्यासाठी आणि फंड ट्रान्सफर करण्यासाठी केला. पोलिसांच्या तपासात, 238 म्युल्स म्हणजेच भाड्याने घेतलेल्या बँक खात्यांबद्दल माहिती गोळा केली. फसवणुकीचे पैसे टेलिग्राम चॅनेलद्वारे USDT (क्रिप्टोकरन्सी) मध्ये रूपांतरित केले गेले आणि ते परदेशात पाठवले गेले. पोलिसांनी आरोपींकडून 16 मोबाईल फोन आणि रक्कम जप्त केली. संबंधित वृद्धाने फसवणूकीच्या तीन आठवड्यांनंतर, पोलिसांकडे तक्रार केली आणि तोपर्यंत, आरोपी ते पैसे ट्रान्सफर केले होते. अहमदाबाद सायबर क्राइमने याबाबत गुन्हा दाखल करून प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3704,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1183,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,517,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,295,Maharashtra,1690,Mumbai,407,Nagpur,47,Nashik,56,Politics,601,Pune,1862,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,41,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: व्हिडीओ कॉल, धमकी अन् अश्लील व्हिडीओ... 82 वर्षीय वृद्धासोबत घडलं भयानक!
व्हिडीओ कॉल, धमकी अन् अश्लील व्हिडीओ... 82 वर्षीय वृद्धासोबत घडलं भयानक!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiAbEOe8BVBNH9HPyCZmtkUeQbAFGH9qq8fKreCuykTMZXcXA-hGO9ltoMewNVcAOOhY-jiwO0v4jNOpLhVeFtP5QIwitg07_py8KVdT57rPMHfGcTQHe0hh55EH3xVxFcQJRwTgMGhZDz0T0uJSfbnX4Omh5AA_nU8w00vWTco-6zMXOENmvFS77S7Rb0/s320/1001717779.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiAbEOe8BVBNH9HPyCZmtkUeQbAFGH9qq8fKreCuykTMZXcXA-hGO9ltoMewNVcAOOhY-jiwO0v4jNOpLhVeFtP5QIwitg07_py8KVdT57rPMHfGcTQHe0hh55EH3xVxFcQJRwTgMGhZDz0T0uJSfbnX4Omh5AA_nU8w00vWTco-6zMXOENmvFS77S7Rb0/s72-c/1001717779.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/01/82.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/01/82.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content