लग्नाला 14 दिवस उरले असताना नवरी समलिंगी मैत्रिणीसोबत फरार... | CrimeNama
Loading ...

लग्नाला 14 दिवस उरले असताना नवरी समलिंगी मैत्रिणीसोबत फरार...

  समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता असली तरी, अजूनही समाजाकडून त्याच्या विरोध केला जात असल्याचं पाहायला मिळतं. पंजाबमधील तरनतारन येथील असाच ...

 


समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता असली तरी, अजूनही समाजाकडून त्याच्या विरोध केला जात असल्याचं पाहायला मिळतं. पंजाबमधील तरनतारन येथील असाच एक धक्कादायक प्रकार सध्या चर्चेत आहे.

येथे एक महिला तिचं लग्न 14 दिवसांवर येऊन ठेपलं असताना, आपली गर्लफ्रेंड म्हणवणाऱ्या महिलेसोबत पळून गेल्याची बातमी समोर आली आहे.


तरुणीच्या मैत्रिणीचा धक्कादायक दावा...


मिळालेल्या माहितीनुसार, मुरादपूरा परिसरात राहणाऱ्या लखविंदर कौर नावाच्या तरुणीचं 14 जानेवारी रोजी एका तरुणासोबत लग्न ठरलं होतं. तिच्या लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. कन्यादानापासून ते हुंड्यापर्यंत सर्व काही ठरवण्यात आलं होतं. लग्नाच्या पत्रिका देखील छापण्यात आल्या होत्या. घरात आनंदाचं वातावरण होतं. दरम्यान, लखविंदरची मैत्रीण सुनीताने तिच्या कुटुंबियांसमोर धक्कादायक दावा केला. ती कधीच लखविंदरचं दुसऱ्या कोणासोबत लग्न होऊ देणार नसल्याचं तिने सांगितलं. ती म्हणाली, त्या दोघी एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. सुरुवातीला, तरुणीच्या आईने मस्करी समजून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं.

मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप


पण 24 डिसेंबरच्या सकाळी घरातील आनंदाचं वातावरण अचानक बदललं. सकाळी 10 वाजताच्या सुमारास सुनीता तिची मैत्रीण लखविंदर कौरला सोबत घेऊन पळून गेली आणि दोघी अचानक घरातून गायब झाल्या. कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्याबद्दल कुठेच माहिती मिळाली नाही. घरातून अचानक मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आणि समाजात बदनामीची भिती सुद्धा वाटली. त्यानंतर, लखविंदरच्या आईने पोलिसात तक्रार दाखल करत सुनीताने तिच्या नातेवाईकांसोबत मिळून आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप केला. तिच्या म्हणण्यानुसार, मुलीचं लग्न मोडल्याने कुटुंबियांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे आणि त्यामुळे तिने पोलिसांकडे न्यायाची मागणी केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे. तसेच, या प्रकरणासंबंधी तक्रार नोंदवण्यात आली असून महिला पोलीस अधिकाऱ्याकडे याचा तपास सोपवण्यात आल्याचं डीएसपी यांनी सांगितलं. तसेच, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याची माहिती आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,81,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3780,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1244,Dhule,12,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,450,India,561,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,298,Maharashtra,1709,Mumbai,415,Nagpur,49,Nashik,58,Politics,606,Pune,1874,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,42,Sport,65,Technology,33,World,67,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: लग्नाला 14 दिवस उरले असताना नवरी समलिंगी मैत्रिणीसोबत फरार...
लग्नाला 14 दिवस उरले असताना नवरी समलिंगी मैत्रिणीसोबत फरार...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhPEFxj7Ss_4n1HUX2oVCrirtq4P03kXUcWfbnjMbrWjZ7xAo7a7P1ibqZSdb3rYj_G8vtWlXegahHUQHJAGX822ybXbwUtuSJS8jYeDa_SX0aRom6BJ8YruQ97yA8t7hhqng9X5vk_FDEMKqnPx43XMmjFVexjun5PNormvFtmUiuJamNO1igYtl0CwBE/s320/1001708739.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhPEFxj7Ss_4n1HUX2oVCrirtq4P03kXUcWfbnjMbrWjZ7xAo7a7P1ibqZSdb3rYj_G8vtWlXegahHUQHJAGX822ybXbwUtuSJS8jYeDa_SX0aRom6BJ8YruQ97yA8t7hhqng9X5vk_FDEMKqnPx43XMmjFVexjun5PNormvFtmUiuJamNO1igYtl0CwBE/s72-c/1001708739.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/01/14.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/01/14.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content