एकतर्फी प्रेमात बनला हैवान, नगरसेवकाच्या मुलाने 10 वीत शिकणाऱ्या मुलीला जिवंत जाळलं... | CrimeNama
Loading ...

एकतर्फी प्रेमात बनला हैवान, नगरसेवकाच्या मुलाने 10 वीत शिकणाऱ्या मुलीला जिवंत जाळलं...

  वॉर्ड नगरसेवकाच्या मुलाने दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

 


वॉर्ड नगरसेवकाच्या मुलाने दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. 17 जानेवारी रोजी ही भीषण घटना घडली असून 22 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान, पीडितेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

बिहारच्या पाटना येथील गोपालपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बेरिया गावात तिथल्या नगरसेवकाच्या मुलाने हे भयानक कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. मृत तरुणी ही 10 वीची विद्यार्थी होती आणि ती तिच्या आजीच्या घरी राहून शिक्षण पूर्ण करत होती. घटनेच्या दिवशी, पीडिता आपल्या आजीच्या घरातून तिच्या घरात परतत असताना, वॉर्ड नगरसेवक शंभू पासवान यांचा मुलगा आदित्य याने तिला रस्त्यात अडवलं आणि तिच्यासोबत भयानक कृत्य केलं.


17 जानेवारी रोजी आरोपीने पीडितेला एका पिंपळाच्या झाडाजवळ रोखलं आणि तिच्याशी बोलण्याचा हट्ट करू लागला. त्यावेळी, पीडितेने नकार दिल्यावर आरोपीने आधी तिला धमकावलं आणि नंतर तिला एक फोटो दाखवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर, तिला जाळून टाकणार असल्याचं देखील त्याने सांगितलं.


प्रत्यक्षदर्शी आणि कुटुंबीयांचा जबाब


प्रत्यक्षदर्शी आणि कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वाटेत दोघांमध्ये वाद सुरू असताना आरोपीने मुलीवर पेट्रोल ओतलं आणि पेटलेली काडी तिच्यावर फेकून तिला जिवंत जाळलं. आग लागताच, मुलगी ओरडत ओरडत सुमारे 150 फूट रस्त्यावर धावत गेली आणि काही अंतर गेल्यावर ती खाली कोसळली. तरुणीची परिस्थिती पाहून स्थानिक मदतीला धावले आणि त्यांनी कशीबशी आग विझवली. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत पीडितेला पाटण्यातील नालंदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (एनएमसीएच) मध्ये दाखल केलं.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3704,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1183,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,517,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,295,Maharashtra,1690,Mumbai,407,Nagpur,47,Nashik,56,Politics,601,Pune,1862,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,41,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: एकतर्फी प्रेमात बनला हैवान, नगरसेवकाच्या मुलाने 10 वीत शिकणाऱ्या मुलीला जिवंत जाळलं...
एकतर्फी प्रेमात बनला हैवान, नगरसेवकाच्या मुलाने 10 वीत शिकणाऱ्या मुलीला जिवंत जाळलं...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgRNBphdWL8EBOB3gMPmQ583Ykq9RPMSFSsksrO3gZleweiwuUqwnOP6YTP-8M2JU13cVkqmO5aJRSrW3fm5bjau6Je0dYUJ3lPr7wt16qdcxPuZO0zwMB-TDmWlvxGmBtfehXwqF9Cbd8So-6PY8zRKjW2LBcz7ekxkjgQ8TMCx5PaG3LC8MHexFFPlQY/s320/1001799070.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgRNBphdWL8EBOB3gMPmQ583Ykq9RPMSFSsksrO3gZleweiwuUqwnOP6YTP-8M2JU13cVkqmO5aJRSrW3fm5bjau6Je0dYUJ3lPr7wt16qdcxPuZO0zwMB-TDmWlvxGmBtfehXwqF9Cbd8So-6PY8zRKjW2LBcz7ekxkjgQ8TMCx5PaG3LC8MHexFFPlQY/s72-c/1001799070.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/01/10_24.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/01/10_24.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content