लातूरमध्ये इन्शुरन्साठी दाखवला स्वतःचा 'मृत्यू'; लिफ्ट मागणाऱ्यालाच जाळलं जिवंत. | CrimeNama
Loading ...

लातूरमध्ये इन्शुरन्साठी दाखवला स्वतःचा 'मृत्यू'; लिफ्ट मागणाऱ्यालाच जाळलं जिवंत.

  लातूर : एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा हकनाक बळी घेतल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आह...

 


लातूर : एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा हकनाक बळी घेतल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लातूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या प्रकरणाचा छडा लावत सत्य उलगडले आहे.

डोक्यावरील कर्जातून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. विशेष म्हणजे, या बनावासाठी लिफ्ट मागणाऱ्या एका निरपराध वृद्धाचा खून करण्यात आल्याची खळबजनक घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी, आरोपीविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औसा तालुक्यातील वानवडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास स्कोडा कंपनीची चारचाकी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेत गाडीतील चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मृताचे वय अंदाजे (वय 35) सल्याचे सांगण्यात येत होते. वाहनात सापडलेल्या काही वस्तूंवरून हा मृतदेह औसा तांडा येथील गणेश चव्हाण याचा असल्याचा समज निर्माण झाला होता. मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. तपासादरम्यान गणेश चव्हाण याच्या कॉल डिटेल्स तपासण्यात आल्या. त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आणि अखेर अवघ्या 24 तासांत गणेश चव्हाण जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. स्वतःच्या मृत्यूचा बनाव करून तो फरार झाल्याचेही पोलिस तपासात उघडकीस आले.

गणेश चव्हाण (रा. औसा तांडा) हा एका खाजगी फायनान्स कंपनीत कार्यरत होता. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. अनेक आर्थिक व्यवहार अडचणीत आले होते, फ्लॅटचे हप्तेही थकले होते. या संकटातून सुटका मिळवण्यासाठी त्याने आधी एक कोटी रुपयांचा विमा उतरवला आणि नंतर स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. तुळजापूर टी-पॉईंट परिसरात लिफ्ट मागणाऱ्या गोविंद यादव (वृद्ध व्यक्ती) यांना त्याने गाडीत बसवले. पुढे त्यांचा खून करून मृतदेह ड्रायव्हर सीटवर ठेवला आणि गाडीला आग लावली. आपणच मृत असल्याचे सिद्ध करण्यासाठी आरोपीने स्वतःचे कपडे मृतदेहाजवळ ठेवले होते. मात्र, काही संशयास्पद बाबींमुळे पोलिसांचा संशय बळावला. तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आणि अखेर गणेश चव्हाण पोलिसांच्या हाती लागला. या घटनेत निष्पाप वृद्धाचा हकनाक बळी गेल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत कोकणातील विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) येथून आरोपी गणेश चव्हाण याला अटक केली आहे.


दरम्यान, जळालेल्या कारमधून प्राप्त झालेल्या हातातील कडे आणि कारचा क्रमांक यावरून हा सांगाडा गणेश चव्हाण याचाच असल्याचा नातेवाइकांनी दावा केला. घटनास्थळावर जळालेल्या कारचा क्रमांक १ (एम.एच. ४३ ए.बी. ४२००) असून, पोलिसांनी कारच्या मालकाचा शोध घेतला. ही कार बळीराम गंगाधर राठोड (रा. औसा तांडा) यांची असल्याचे तपासणीमध्ये समोर आले. हे वाहन मेहुणा गणेश गोपीनाथ चव्हाण (रा. विठ्ठल नगर, औसा) वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गणेश चव्हाण याचा शोध घेतला असता, तो १३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता मित्राला लॅपटॉप देण्यासाठी बाहेर पडला. तो घरी परतला नसल्याची माहिती पत्नीने दिली. घटनास्थळावरील पुरावे, मोबाइल चॅटिंग आधारे आरोपीचा शोध घेतला. एक सुगावा पोलिसांच्या हाती लागला त्यानंतर बनावट मृत्यूचा आणि गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. गणेश चव्हाण याने हा बनाव केल्याची खात्री पोलिसांना पटली. त्यांनी विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) गाठले. त्यास अटक केल्यानंतर खाक्या दाखवला. एक कोटीच्या विम्यासाठी, कर्जबाजारीपणातून आपणच दुसऱ्याला जाळल्याची कबुली त्याने दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,35,Breakin,1,Breaking,3654,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1144,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,489,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,291,Maharashtra,1675,Mumbai,404,Nagpur,46,Nashik,56,Politics,598,Pune,1852,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,39,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: लातूरमध्ये इन्शुरन्साठी दाखवला स्वतःचा 'मृत्यू'; लिफ्ट मागणाऱ्यालाच जाळलं जिवंत.
लातूरमध्ये इन्शुरन्साठी दाखवला स्वतःचा 'मृत्यू'; लिफ्ट मागणाऱ्यालाच जाळलं जिवंत.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjq0Vw7yfNPBi3YspgAkfkUSjs6ySLvu7Mrm9xJbl1Okm2SjhDBaiyFK-P3kKB-Jk_pzxOgFqcluOp1oI__uyzN5bzj0xRsPkbFddYli5flzCO-Cpqgc0r_HG70DcdMIxn9X0XBCN5wtENY6rX-Y1Fwtg0VFtquPZMzPg1AyA2MvqUhKJqN4YOgoZ6JEiw/s320/1001642963.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjq0Vw7yfNPBi3YspgAkfkUSjs6ySLvu7Mrm9xJbl1Okm2SjhDBaiyFK-P3kKB-Jk_pzxOgFqcluOp1oI__uyzN5bzj0xRsPkbFddYli5flzCO-Cpqgc0r_HG70DcdMIxn9X0XBCN5wtENY6rX-Y1Fwtg0VFtquPZMzPg1AyA2MvqUhKJqN4YOgoZ6JEiw/s72-c/1001642963.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/12/blog-post_96.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/12/blog-post_96.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content