मुंबई: अभिनेत्री गिरीजा ओक ही प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची कन्या. गिरीजा ओक हिन अनेक मालिका, वेब सीरिज आणि चित्रपटांमधून भूमिका साकारल्...
मुंबई: अभिनेत्री गिरीजा ओक ही प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची कन्या. गिरीजा ओक हिन अनेक मालिका, वेब सीरिज आणि चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती.
रातोरांत 'ती' नॅशनल क्रश बनली.
गिरिश ओक यांनी गिरीजाची आई पद्मश्री पाठक यांच्यासोबत पहिले लग्न केलेलं. पण, त्यानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर गिरीश ओक यांनी दुसरं लग्न केले. एका मुलाखतीत गिरीजा ओकनं आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत भाष्य केले आहे. गिरिजा ओक म्हणाली, 'माझ्या आईवडिलांमध्ये मतभेद होते. या गोष्टी मला माहीत होत्या. हळूहळू या गोष्टी वाढत गेल्या. त्यानंतर त्यांनी मग वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आम्ही रोज यातून जात होतो आणि आमचं बाकीचं आयुष्यही जगत होतो, तेव्हा मला काय होतंय हे कळत नव्हतं. मला पॅनिक अटॅक यायचे. मला प्रचंड घाम यायचा. मला कसंतरीच फिल व्हायचं. आणि हे कुठेही व्हायचं… म्हणजे मी कॉलेजला जाताना किंवा मी लॅबमध्ये असताना, म्हणजे मी करत असलेल्या गोष्टींचं मला टेन्शन नव्हतं. पण, इतक्या वर्षांपासून मी जो तणाव घेतला होता, त्याला माझं शरीर अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देत होतं. पण, हा तणाव आहे, हेदेखील मला माहीत नव्हतं…"
"एका घटस्फोटित आई-वडिलांची मुलगी असल्याचं ओझं घेऊन मी जगत होते. जेव्हा मी छोटी होते, जेव्हा माझं लग्न झालेले नव्हते तेव्हा मी हाच विचार करायचे की, मी माझं लग्न टिकवून दाखवेन. हे प्रेशर मी स्वत:हून घेतलं होते. पण, मी त्याच दृष्टिकोनातून रिलेशनशिपकडे बघायचे. सुदैवानं मी अशा माणसाशी लग्न केलंय, जो माझा खूप चांगला मित्र आहे. मी त्याच्यासोबत कोणत्याही विषयावर बोलू शकते. आम्ही आता 15 वर्षांपासून एकत्र आहोत, लग्नाला 14 वर्ष झाली आहेत, त्यामुळे आम्हाला सगळं माहीत आहे एकमेकांबद्दल…' असे गिरिजा ओक म्हणाली.


COMMENTS