प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर मराठी विज्ञान परिषद पुणे यांच्या अंतर्गत अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर जुन्नर या विद्यालयात विज्ञान मंडळाची ...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
मराठी विज्ञान परिषद पुणे यांच्या अंतर्गत अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर जुन्नर या विद्यालयात विज्ञान मंडळाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बारवे एस वाय यांनी दिली.
याप्रसंगी मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे अशोक तातुगडे , अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एस एस शिंदे , विद्यालयाचे माजी शिक्षक वाईकर पी. व्ही., मुख्याध्यापिका बारवे एस वाय, परीक्षक शिंदे ए बी, विज्ञान विभाग प्रमुख पुरी ए आर, गणित विज्ञान प्रमुख पापडे आर व्ही, दातीर एस. एम., गाडे एम.डी., ताजणे पी. आर. , पानसरे एम. व्ही., पुंडे आर. एस. आदींसह विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रामीण भागात विज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा, विज्ञानातील मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी या विज्ञान मंडळाची स्थापना अण्णासाहेब आवटे विद्यामंदिरात केले असल्याचे मराठी विज्ञान परिषदेचे अशोक तातूगडे यांनी सांगितले. याप्रसंगी एस.एस. शिंदे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत काही प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविला. अमावस्या , पोर्णिमा, ग्रहण, भोंदूगिरी, नजर लागणे , अंगात येणे यामागचे वैज्ञानिक तत्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे शंका निरसन केले.
विज्ञान मंडळामार्फत वर्षभर विविध वैज्ञानिक उपक्रम विद्यालयांमध्ये राबविले जाणार असल्याचे प्रास्ताविकात विज्ञान प्रमुख पुरी ए आर यांनी सांगितले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताजणे पी आर यांनी केले.


COMMENTS