प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर जुन्नर : डिसेंट फाउंडेशन, पुणे , हायस्पीड स्किल हब जुन्नर व पारुंडे गावचे सरपंच किसन जाधव यांच्या संयुक्...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
जुन्नर : डिसेंट फाउंडेशन, पुणे , हायस्पीड स्किल हब जुन्नर व पारुंडे गावचे सरपंच किसन जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने “मोफत शिवणकला प्रशिक्षण व उद्यम आधार कार्ड वाटप” हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रशिक्षणाचा शुभारंभ मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता अस्मिता भवन , पारुंडे (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे संपन्न झाला .
४० दिवसांच्या या प्रशिक्षणामध्ये महिलांना शिवणकलेचे सखोल मार्गदर्शन देण्यात येणार असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना उद्यम आधार कार्ड देण्यात येईल. तसेच डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉ.एफ.बी.आतार यांच्याकडून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन भेट देण्यात येणार असून या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविणे व रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा असल्याचे डिसेंट फाउंडेशचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी यावेळी सांगितले .
या प्रसंगी हायस्पीड स्किल हबचे संस्थापक दिलीप भगत ,डिसेंट फाउंडेशनचे सेक्रेटरी डॉ.एफ.बी.आतार ,पारुंडे गावचे सरपंच किसन जाधव ,प्रशिक्षक शितल पवार ,माजी सरपंच सविता जाधव ,मंगल तांबे व प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती पुंडे यांनी केले तर आभार जरीना शेख यांनी मानले .




COMMENTS