ख्रिसमसच्या रात्री क्लबबाहेर भयानक घडलं, वादाचं हाणामारीत रूपांतर अन्... | CrimeNama
Loading ...

ख्रिसमसच्या रात्री क्लबबाहेर भयानक घडलं, वादाचं हाणामारीत रूपांतर अन्...

  नागपुरात ख्रिसमसच्या रात्रीच भयंकर घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथील हॉटेल प्राइड चौकातील डाबो क्लबजवळ एका 28 वर्षीय तरुणाची हत्या क...

 


नागपुरात ख्रिसमसच्या रात्रीच भयंकर घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथील हॉटेल प्राइड चौकातील डाबो क्लबजवळ एका 28 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचं वृत्त आहे. दोन गटांमधील झालेला वाद हा थेट हाणीमारीपर्यंत पोहोचला आणि याच दरम्यान, तरुणाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित घटना शुक्रवारी (26 डिसेंबर) पहाटे चार वाजताच्या सुमारास नागपुरातील सोनगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडली.


पार्टी संपल्यानंतर, दोन्ही गटांत वाद अन्...


मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणातील मृत तरुणाचं नाव प्रणव नरेश नन्नावरे असून या घटनेत ब्रिजलाल कारडा नावाचा 34 वर्षीय तरुण सुद्धा गंभीररित्या जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित तरुणावर आता खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. ख्रिसमस पार्टीच्या निमित्ताने शहरातील क्लब पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. याच वेळी, वर्धा रोडवरील एका नामांकित क्लबमध्ये काही तरुणांनी पार्टी आयोजित केली होती. मात्र, पार्टी संपल्यानंतर प्राईड स्क्वेअर हॉटेलजवळ उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनाजवळ दोन गटांमध्ये वाद झाला आणि काही क्षणांतच हा वाद मारहाणीत बदलला.

लोखंडी रॉडने हल्ला करत हत्या


हा वाद सुरू असतानाच मेहुल रहाटे नावाच्या तरुणाने प्रणव नन्नावरे आणि गौरव कारडा यांच्यावर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात, दोन्ही पीडित तरुण गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना तातडीने नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान डॉक्टरांनी पीडित प्रणयला मृत घोषित केलं आणि गौरव कारडा याची प्रकृती अतिशय गंभीर असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

लगेच सोनगाव पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आणि घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेत, आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. या गंभीर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3704,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1183,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,517,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,295,Maharashtra,1690,Mumbai,407,Nagpur,47,Nashik,56,Politics,601,Pune,1862,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,41,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: ख्रिसमसच्या रात्री क्लबबाहेर भयानक घडलं, वादाचं हाणामारीत रूपांतर अन्...
ख्रिसमसच्या रात्री क्लबबाहेर भयानक घडलं, वादाचं हाणामारीत रूपांतर अन्...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhVcFZl6rGPx9gQl841iJ97xA0Okp-5zVLJ4OQ6A_SIKAObWi0F6trQ7-rL7bojzp7fQwQojDRZl_SgKSynqMTuceKkDvR0lmzUzNMELGI_DgChGFyWON-JO90ErDgkUj-KWu3V7uiflbxTCT6bGRvXe27zrKYUB7uvcuYtETMXA7eKY2UKmAnBmK2-Dio/s320/1001680461.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhVcFZl6rGPx9gQl841iJ97xA0Okp-5zVLJ4OQ6A_SIKAObWi0F6trQ7-rL7bojzp7fQwQojDRZl_SgKSynqMTuceKkDvR0lmzUzNMELGI_DgChGFyWON-JO90ErDgkUj-KWu3V7uiflbxTCT6bGRvXe27zrKYUB7uvcuYtETMXA7eKY2UKmAnBmK2-Dio/s72-c/1001680461.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/12/blog-post_80.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/12/blog-post_80.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content