उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून अनैतिक संबंधाचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथील रहिवासी असलेला शाहनवाज नावाचा तरुण आपली पत्नी, मुले आ...
उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून अनैतिक संबंधाचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथील रहिवासी असलेला शाहनवाज नावाचा तरुण आपली पत्नी, मुले आणि आईच्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन नोकरी करत होता.
त्यामुळे घरी फक्त त्याची पत्नी जैनब, मुले आणि त्याची आई शमीमा राहत होती. मात्र, घरापासून दूर राहून नोकरी करणं शाहनवाजला महागात पडल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर, पत्नी जैनबचे मेहर अली नावाच्या पुरुषासोबत अनैतिक संबंध सुरू झाले. संधी मिळताच ते दोघे एकमेकांना भेटायचे आणि जवळीक साधायचे. मात्र, या दोघांच्या कृत्यामुळेच 18 डिसेंबर रोजी एक भयानक घटना घडल्याचं वृत्त आहे.
18 डिसेंबरच्या रात्री जैनब आणि तिचा प्रियकर शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना तिच्या 65 वर्षीय सासुने पाहिलं. त्यावेळी, शमीमाच्या पायाखालची जमिनच सरकली. आपल्या सुनेच्या प्रेमसंबंधाबद्दल मुलाला सांगणार असल्याचं शमीमा जैनबला म्हणाली. त्यावेळी, जैनबने तिच्या सासुला असं करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु, शमीमा तिचं काहीच ऐकत नव्हती.
सासुने सुनेला तिच्या प्रियकरासोबत पाहिलं अन्...
शमीमा जैनबला म्हणाली की, "मी माझ्या मुलाला तुझ्या अनैतिक प्रेमसंबंधाबद्दल सांगणार." त्यावेळी महिलेने संतापून तिच्या प्रियकर मेहर अलीसोबत मिळून सासुचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर, दोघे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस सकाळी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, पीडित शमीमाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचं रिपोर्ट्समधून समोर आलं. हे सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी मृत महिलेच्या सुनेचा शोध घेण्यास सुरूवात केली. तपास केला असता, पोलिसांनी जैनब आणि तिचा प्रियकर मेहर अली यांना अटक केली.
पोलिसांनी आरोपींना केली अटक
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान जैनबने आपला गुन्हा कबूल केला आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या मेहर अली नावाच्या तरुणासोबत आपले अनैतिक संबंध असल्याचं तिने सांगितलं. घटनेच्या दिवशी, जैनबला तिच्या सासुने प्रियकरासोबत जवळीक साधताना पाहिलं आणि याचा तिच्या सासुने विरोध केला. तसेच, ती जैबनच्या प्रेमसंबंधाबाबत पतीला सांगण्याची धमकी देत होती. यामुळे संतापलेल्या आरोपी महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या सासुची हत्या केली. पोलिसांनी प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची तुरुंगात रवागनी करण्यात आली आहे.


COMMENTS