पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या श...
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी आज (बुधवार) दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास अटक केली.
याआधी दोन ते तीन वेळा तिची कसून चौकशी करण्यात आली होती.
पार्थ पवार हे संचालक असलेल्या अमेडिया कंपनीच्या कोरेगाव पार्कातील जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी यांचा दोन ते तीन वेळा जबाब नोंदविण्यात आला. तसेच विविध शासकीय विभागांकडून मागविण्यात आलेल्या कागदपत्रांची चौकशी देखील करण्यात आली होती. गरज भासल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात येईल, असे पोलिसांकडून त्यांना सांगण्यात आले होते. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अखेर आज अटकेची कारवाई केली.
मुंढवा येथील कोट्यवधींच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या शीतल तेजवानीवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, मुंढवा जमीन प्रकरणात २७५ जणांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. ही जमीन कुलमुख्यारपत्र करुन शीतल तेजवानी यांना संबंधित व्यक्तींनी दिली आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास केला.


COMMENTS