प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर दिनांक २७/ १२/ २०२५ रोजी श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे कै.इंदिराबाई जोगळेकर वादविवाद व गटचर्चा स्...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
दिनांक २७/ १२/ २०२५ रोजी श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे कै.इंदिराबाई जोगळेकर वादविवाद व गटचर्चा स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त श्री अनिलकाका जोगळेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. बी.वाघमारे व अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी,उपप्राचार्य डॉ.आर.डी.चौधरी,कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक व उपप्राचार्य प्रा.पी.एस.लोढा, पर्यवेक्षक प्रा एस.ए. श्रीमंते,कार्यालयीन प्रबंधक सौ.एम.डी.कोरे,एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा.के.जी.नेटके,कला विभाग प्रमुख प्रा.आर.एस.कांबळे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
१९७७ पासून कै.इंदिराबाई जोगळेकर वादविवाद व गटचर्चा स्पर्धा सुरू करण्यात आली ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी मा.अनिलकाका जोगळेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.भविष्यात या स्पर्धा तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय व्हाव्यात व त्यातून चांगले वक्ते तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करून या वादविवाद व गटचर्चा स्पर्धेचे उद्घाटन केले.
अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी. कुलकर्णी यांनी या स्पर्धेमुळे महाविद्यालयात अनेक वक्ते तयार होतील व त्यांचा सर्वांगीण विकास होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व श्री अनिलकाका जोगळेकर यांच्याकडून तरुणांनी प्रेरणा घ्यावी असे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
वरिष्ठ महाविद्यालयातील १६ विद्यार्थ्यांनी वादविवाद स्पर्धेत भाग घेतला व कनिष्ठ महाविद्यालयातील ५४ विद्यार्थ्यांनी गटचर्चा स्पर्धेत भाग घेतला.स्पर्धक विद्यार्थ्यांना सिनिअर वकृत्व मंडळाच्या चेअरमन डॉ वंदना नढे व ज्युनिअर वक्तृत्व मंडळाच्या चेअरमन प्रा.एस.डी.सोनार तसेच वक्तृत्व मंडळातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका यांनी मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वंदना नढे यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.ऐ.टी.जराड यांनी केला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा.वाय. सी.गिरमे,प्रा.पी.एस.उतळे व प्रा.आर.बी.जोशी आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.जी.एम.रोकडे ,प्रा.आर.ए.मोरे व प्रा.एस.जी.भोर यांनी काम केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिक्षा सुकाळे व आभार प्रा.एस.बी.गवळी यांनी मानले.




COMMENTS