लग्न ठरलं पण, त्यानंतर असं काय घडलं की तरुणाने त्याच्या होणाऱ्या बायकोलाच संपवलं? | CrimeNama
Loading ...

लग्न ठरलं पण, त्यानंतर असं काय घडलं की तरुणाने त्याच्या होणाऱ्या बायकोलाच संपवलं?

  उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे आरोपी तरुणाने त्याच्या प्रेयसी आणि प्रेयसीच्या आईसोबत मिळून एक...

 


उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे आरोपी तरुणाने त्याच्या प्रेयसी आणि प्रेयसीच्या आईसोबत मिळून एका 18 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

पीडित तरुणीची गळा दाबून तिची हत्या करण्यात आली आणि नंतर पुरावे मिटवण्यासाठी तिचा मृतदेह आगीत जाळून टाकल्याचा आरोप आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, शालिमुनिश अशी मृत तरुणीची ओळख समोर आली असून ती बलरामपूरच्या लालडीह हुसैनाबाद ग्रँट परिसरातील रहिवासी होती. काही महिन्यांपूर्वी तिचं गोंडा जिल्ह्यातील छपिया येथे राहणाऱ्या इमरान नावाच्या तरुणासोबत लग्न ठरलं होतं. मात्र, दोघांच्या लग्नापूर्वीच ही भयानक घटना घडली. नेमकं प्रकरण काय?


लग्न ठरल्यानंतर तरुणाचे दुसरीकडे प्रेमसंबंध...


बलरामपूरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न ठरल्यानंतर इमरानची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका सकीना नावाच्या महिलेशी ओळख झाली. त्यानंतर, दोघांमध्ये जवळीक वाढत गेली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पीडिता शालिमुनिशला तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या प्रेमसंबंधाबद्दल कळताच तिने आरोपीला याबाबत जाब विचारला आणि त्यामुळे त्यांच्यात वाद झाले.

गळा दाबून केली हत्या


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी इमरानने शालिमुनिशचा काटा काढण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या हत्येचा कट रचण्यात आला. योजनेनुसार, सकीनाने पीडित तरुणीला तिच्या घरी बोलवलं. तिथे, इमरान सुद्धा उपस्थित होता. त्यावेळी, त्या दोघांनी मिळून पीडित शालिमुनिशचा गळा दाबला आणि तिची हत्या केली. इतकेच नव्हे तर, हत्येनंतर आरोपींनी ही घटना आत्महत्या असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्येनंतर पुरावे मिटवण्यासाठी इमरान, सकीना आणि तिची आई जैनब हिने मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळून टाकल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान, हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तसेच, बीएनएसच्या संबंधित कलमांखाली पोलिसांनी इमरान, सकीना आणि जैनब यांच्यावरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याचं सांगितलं जात आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,81,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3753,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1226,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,546,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,296,Maharashtra,1701,Mumbai,410,Nagpur,49,Nashik,57,Politics,603,Pune,1870,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,42,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: लग्न ठरलं पण, त्यानंतर असं काय घडलं की तरुणाने त्याच्या होणाऱ्या बायकोलाच संपवलं?
लग्न ठरलं पण, त्यानंतर असं काय घडलं की तरुणाने त्याच्या होणाऱ्या बायकोलाच संपवलं?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhKueNxDj2sw8HULM-7b7avJrS8Slz-VFSzuwMQguUX-5D0NJ59UAydr45z0JmT-Cq-Hl73ezANpqQj4aAK9FH2eCUuOvcUvRi1kOJLdR3EN_9fpJlId9rtVxVqLvGcPHhIYvCuSnVEj_dKsPRqtdA6EUe8QwzGDEbhmye_QzuBtTXTKViXXuHqEyOhypM/s320/1001676808.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhKueNxDj2sw8HULM-7b7avJrS8Slz-VFSzuwMQguUX-5D0NJ59UAydr45z0JmT-Cq-Hl73ezANpqQj4aAK9FH2eCUuOvcUvRi1kOJLdR3EN_9fpJlId9rtVxVqLvGcPHhIYvCuSnVEj_dKsPRqtdA6EUe8QwzGDEbhmye_QzuBtTXTKViXXuHqEyOhypM/s72-c/1001676808.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/12/blog-post_31.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/12/blog-post_31.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content