बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज (मंगळवार) बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. या स...
बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज (मंगळवार) बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली.
वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना धक्क बसला असून बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दोषारोप निश्चिती करण्यात आली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात 23वी सुनावणी झाली. मागील सुनावणीत आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला होता. तसेच संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडीओ आरोपींच्या वकिलांना दिल्यानंतर सर्व आरोपींवर आज आरोप निश्चित करण्यात आले आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे यांच्यासह फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या विरोधात दोषारोप निश्चिती करण्यात आली आहे. खंडणी, अपहरण, हत्या, पुरावे नष्ट करणे, कट कारस्थान, संघटितपणे गुन्हेगारी कारवाई करणे आणि जातीवाचक शिवीगाळ, कंपनीचे नुकसान अशा विविध कलमाखाली दोषारोप निश्चित केले आहेत. यात पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे. यामुळे वाल्मिक कराड सर्व आरोपींना धक्का समजला जात आहे.


COMMENTS