छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे युवतीची अज्ञाताने घरात गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. वैष्णवी संतोष...
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे युवतीची अज्ञाताने घरात गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. वैष्णवी संतोष नीळ (वय १८) असे मृत युवतीचे नाव आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांत वाळूज पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नानासाहेब कडूबा मोरे (वय २७, रा. मुरमी) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी ही वाळूज येथील साईनाथ महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होती. वैष्णवी संतोष नीळ हिची शुक्रवारी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेचा एकाही प्रत्यक्ष साक्षीदार किंवा ठोस पुरावा उपलब्ध नसल्यामुळे आरोपीला शोधणं पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांत वाळूज पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
वैष्णवी ही वाळूजच्या एका महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत होती. कॉलेज संपल्यानंतर शुक्रवारी दुपारी १२ वाजता ती घरी आली. यावेळी तिचे आई-वडील कामानिमित्त, बाहेर गेले होते, तर भाऊही शाळेत गेलेला होता. त्यामुळे वैष्णवी घरी एकटीच होती. हीच संधी साधून त्यांच्याच गल्लीत राहत असलेला आरोपी नानासाहेब मोरे तिच्या घरी आला व त्याने साडेतीन वाजेच्या सुमारास धारदार शस्त्राने वैष्णवीची गळा चिरून हत्या केली. यानंतर तो पसार झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चाडेचार तासांत शनिवारी पहाटे पोलिसांनी आरोपी नानासाहेब मोरे याचा शोध घेऊन अटक केली.
एकाच गल्लीत राहणाऱ्या नानासाहेबसोबत तिचे मैत्रिपूर्णसंबंध होते; परंतु त्यांच्यात वाद वाढल्याने नानासाहेब याने शुक्रवारी क्रूरपणे वैष्णवीची हत्या केली, या घटनेनंतर रात्री नेमका शेजारचा नानासाहेब घरी नसल्याचे पोलिसांना समजले व त्याचा शोध सुरू केला. गंगापूरमधील बोलेगाव येथे लपून बसलेला असताना पहाटे ३.३० ला पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS