प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर जुन्नर येथील शिव छत्रपती महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागातर्फे रविवार, दिनांक- 7 डिसेंबर 2025 रोजी या वर्षी...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर येथील शिव छत्रपती महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागातर्फे रविवार, दिनांक- 7 डिसेंबर 2025 रोजी या वर्षी एन.सी.सी.मध्ये भरती झालेल्या छात्रांचे स्वागत करण्यासाठी समारंभाचे आयोजन केले होते. अशी माहिती एन.सी.सी. विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. बाबासाहेब माने यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये महाविद्यालयातील एन.सी.सी.च्या प्रथम वर्षामध्ये भरती झालेल्या छात्रांना पुढील तीन वर्षांसाठी एन.सी.सी.च्या कार्य पद्धतीबद्दल माहिती देणे व नवागत छात्रांचे स्वागत सत्कार करणे हा उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉ.आर.डी. चौधरी उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये एन.सी.सी.मध्ये भरती झालेल्या नवीन छात्रांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन प्रत्येकाने आपल्या जीवनात उच्च पदे प्राप्त करण्याचे स्वप्न ठेवून त्यानुसार आतापासून तयारी करण्यास सुरुवात करावी असे सांगितले. तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात एन.सी.सी.चे अनुशासन व प्रशिक्षण निश्चित स्वरूपात कामी येते हे जाणून देण्याचा प्रयत्न केला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.सी.सी.विभाग प्रमुख कॅप्टन डॉ.बाबासाहेब माने यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये भरती झालेल्या छात्रांचे स्वागत करत एन.सी.सी.च्या कार्यपद्धती बद्दल विस्तृत माहिती दिली. कॅडेट पूर्वा चव्हाण,कॅडेट सुजल असवले, कॅडेट साईराज कुमकर यांनी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावरती आपले मनोगत व्यक्त केले. कॅडेट ज्ञानेश्वरी मंडलिक, कॅडेट सिद्धी शिंदे, कॅडेट वेदिका बनकर यांनी नृत्य सादर केले. तदनंतर विद्यार्थ्यांची स्टेज डेरिंग वाढावी यासाठी ऐन वेळच्या विषयावरती मिमिक्री करणे,विचार मांडणे व संगीत खुर्चीचा कार्यक्रम देखील आयोजित केला गेला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सिनिअर अंडर ऑफिसर शिवानी गुंजाळ, जुनिअर अंडर ऑफिसर काजल चकवे, जुनियर अंडर ऑफिसर विनायक दातखिळे, सीएचएम आदेश डोके व एलसीपील स्वयम कसबे यांनी विशेष प्रयत्न केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॅडेट सुजल असवले व एलसीपील चैताली दाभाडे यांनी केले.संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे व सर्व संचालक मंडळ,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी, प्राचार्य डॉ.महादेव वाघमारे यांनी छात्रांचे विशेष कौतूक करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



COMMENTS